National player Srushti Raskar esakal
क्रीडा

राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत साताऱ्याच्या सृष्टीचा विजयी 'पंच'

उत्तर प्रदेशला हरवून कॉर्टर फायनलमध्ये प्रवेश, तर अटीतटीच्या सामन्यात हरियानावर बाजी

पांडुरंग बर्गे

सातारा : बॉक्सिंग फेरडेशन ऑफ इंडिया (Boxing Federation of India) यांच्या वतीने सोनिपत (हरियाना) येथे सुरू असलेल्या चौथ्या ज्युनिअर मुलींच्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत (National boxing competition) महाराष्ट्र संघातून (Maharashtra Boxing Team) खेळताना सातारा जिल्ह्याची राष्ट्रीय खेळाडू सृष्टी सुनीलकुमार रासकर (National player Srushti Raskar) हिने कास्यपदक (Bronze Medal) पटकावले. या यशामुळे तिची ज्युनिअर एशियन चॅम्पियनशिप सराव शिबिरासाठी निवड झाली आहे. (Srushti Raskar Of Satara Won A Bronze Medal In The National boxing competition Sports News bam92)

सृष्टीची सोनिपत (हरियाना) येथे होणाऱ्या चौथ्या ज्युनिअर मुलींच्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघामध्ये निवड झाली होती.

पुणे येथे १४ जुलै २०२१ रोजी झालेल्या चाचणी स्पर्धेतून सृष्टी रासकर हिची सोनिपत (हरियाना) येथे होणाऱ्या चौथ्या ज्युनिअर मुलींच्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघामध्ये निवड झाली होती. सोनिपत येथे २६ जुलै रोजी या स्पर्धा सुरू झाल्या. सलामीच्या सामन्यात सृष्टीने आसामला हरवून आपली विजयी वाटचाल सुरू केली. पुढील प्री कॉर्टर सामन्यात तिने उत्तर प्रदेशला हरवून कॉर्टर फायनलमध्ये प्रवेश केला. त्यात हिमाचल प्रदेशला हरवून पदक निश्चित केले. आज झालेल्या सेमिफायनल सामन्यात हरियानाबरोबर झालेल्या अटीतटीच्या सामन्यातून तिने कास्यपदक पटकावले. या यशामुळे तिची ज्युनिअर एशियन चॅम्पियनशिप सराव शिबिरासाठी निवड झाली आहे.

भोसे (ता. कोरेगाव) येथील रहिवासी व कोरेगाव आगारातील वाहक सुनीलकुमार रासकर यांची सृष्टी ही कन्या असून, सध्या ती कुटुंबासह कोरेगाव येथे वास्तव्य करताना सरस्वती विद्यालयात इयत्ता दहावीत शिकत आहे. गेली तीन वर्षे ती सातारा बॉक्सिंग अॅकॅडमीत आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षक सागर जगताप यांच्याकडे नियमित सराव करत आहे. सृष्टीच्या या यशाबद्दल तिचे सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, विभागीय सचिव योगेश मुंदडा, अॅकॅडमीचे पदाधिकारी हरीश शेट्टी, रवींद्र होले, संजय पवार, अमर मोकाशी, बापूसाहेब पोतेकर आदी पदाधिकाऱ्यांसह, भीमराव नाळे (कोरेगाव), भोसे, कोरेगाव ग्रामस्थांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Srushti Raskar Of Satara Won A Bronze Medal In The National boxing competition Sports News bam92

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Latest Marathi Breaking News Live Update: सरकारी जमिनीवरील गृहनिर्माण संस्थाच्या स्वयंपुनर्विकासाला गती देणार - बावनकुळे

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

SCROLL FOR NEXT