Football  sakal
क्रीडा

Football : फुटबॉलमध्ये लैंगिक छळ रोखणार! ; भारतीय संघटनेकडून पाऊल,महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य

भारतातील फुटबॉल संबंधित वातावरण सुरक्षित व सर्वसमावेशक असायला हवे यासाठी अखिल भारतीय फुटबॉल संघटनेकडून (एआयएफएफ) नव्या धोरणाचा अवलंब करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतातील फुटबॉल संबंधित वातावरण सुरक्षित व सर्वसमावेशक असायला हवे यासाठी अखिल भारतीय फुटबॉल संघटनेकडून (एआयएफएफ) नव्या धोरणाचा अवलंब करण्यात आला आहे. एआयएफएफच्या कार्यकारी समितीकडून बुधवारी लैंगिक छळ प्रतिबंध (प्रिवेंशन ऑफ सेक्युअल हरासमेंट, पीओएसएच) धोरणावर शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यामुळे आता भारतातील फुटबॉल क्षेत्रात लैंगिक छळाला आळा बसणार आहे.

दरम्यान, याआधी गोव्यातील म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झालेल्या इंडियन वुमेन लीग २ (आयडब्ल्यूएल) फुटबॉल स्पर्धेतील कालावधीत महिला खेळाडू विनयभंग व मारहाणप्रकरणी अटक झालेले अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) कार्यकारी समिती सदस्य दीपक शर्मा यांना सर्व प्रकारच्या फुटबॉलसंबंधित उपक्रमातून निलंबित करण्यात आले. त्यानंतर दीपक शर्मा यांची जामिनावर सुटकाही करण्यात आली. या प्रकरणानंतर एआयएफएफकडून महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे.

याआधीही घडल्या घटना

- एआयएफएफच्या मुख्यालयात एका महिलेने पुरुषाविरुद्ध छळवणुकीची तक्रार केली होती, पण तिच्याकडून औपचारिकरित्या आरोप करण्यात आला नाही.

- दोन वर्षांपूर्वी भारतीय १७ वर्षांखालील महिला संघाचे सहाय्यक प्रशिक्षक ॲलेक्स ॲम्ब्रोस यांच्याविरुद्ध लैंगिक छळ करण्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाकडून निवडण्यात आलेल्या समितीकडून (सीओए) ॲम्ब्रोस यांना पदावरून काढून टाकण्यात आले होते.

नव्या धोरणाची गरज

एआयएफएफचे प्रभारी सचिव एम. सत्यनारायण यांनी याप्रसंगी मत व्यक्त करताना म्हटले की, लैंगिक छळ प्रतिबंध धोरणाची आमच्या स्टाफला गरज आहे. २०१३ च्या नियमानुसार हे धोरण तयार करण्यात आले आहे. इतर संघटनांच्या धोरणांनुसार यामध्ये बदल करण्यात आला आहे.

भारतीय फुटबॉल संघटनेतील स्टाफ, पदाधिकाऱ्यांना नव्या धोरणाबाबत वर्षातून तीन वेळा माहिती करून देण्यात येणार आहे. ज्युनियर मुली व महिला यांच्या सुरक्षेला विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. नवीन धोरण संघटनेशी संबंधित सर्वांपर्यंत पोहोचवण्याची नितांत गरज आहे.

- एम. सत्यनारायण, प्रभारी सचिव, एआयएफएफ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू, BMC चा निष्काळजीपणा जीवावर बेतला... माणूस पडतानाचा Video समोर... बचावकार्य अपयशी

Mumbai Pune Red Alert : राज्यात मान्सूनची दमदार वाटचाल ! पुढील ४ दिवस पावसाचे; मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांत रेड अलर्ट

Latest Marathi News Live Update : मालेगाव महापालिकेवर 'लँड जिहाद विरोध' जनआक्रोश मोर्चा

Mumbai Manhole Accident : मुंबईत २० ते २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये माणूस पडला; बचावकार्य सुरू... BMC चा निष्काळजीपणा चव्हाट्यावर

अटल टनेलजवळ भीषण अपघात, बोगद्यातून बाहेर येताच स्कॉर्पिओ थेट नदीत बांधकाम सुरू असलेल्या पिलरवर लटकली, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT