Steve Smith  
क्रीडा

वर्ल्ड कप 2023आधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! स्टीव्ह स्मिथ अन् मिचेल स्टार्क 'या' दौऱ्यातून बाहेर

Kiran Mahanavar

भारतात खेळल्या जाणाऱ्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2023आधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार पॅट कमिन्स आधीच दुखापतग्रस्त असून आता कर्णधार स्टीव्ह स्मिथही दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडला आहे.

स्मिथ मनगटाच्या दुखापतीमुळे टी-20 आणि एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी अॅश्टन टर्नरला टी-20 संघात, तर मार्नस लबुशेनला वनडे संघात स्थान मिळाले आहे. मात्र, नुकत्याच जाहीर झालेल्या विश्वचषकाच्या प्राथमिक संघात लबुशेनला स्थान मिळाले नाही.

भारतासोबतच्या मालिकेपूर्वी मिचेल स्टार्कही ऑस्ट्रेलियात मध्येच राहणार आहे. अॅशेस मालिकेदरम्यान त्याला पाठदुखीचा त्रास झाला होता. डावखुरा अनकॅप्ड वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉन्सनचा टी-20 संघात समावेश करण्यात आला आहे. त्याला वनडे मालिकेसाठीही संघात स्थान देण्यात आले आहे.

टी-20 व्यतिरिक्त अष्टपैलू मिचेल मार्शला दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी एकदिवसीय संघाचे कर्णधारपदही देण्यात आले आहे. वनडेचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स अजूनही दुखापतग्रस्त आहे. अॅशेस मालिकेदरम्यान त्यालाही दुखापत झाली होती. त्यांना ६ आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.

अ‍ॅशेस मालिका आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यामुळे खेळाडूंवर कामाचा ताण वाढल्याचे मुख्य निवडकर्ते जॉर्ज बेली यांनी सांगितले. विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर स्टीव्ह स्मिथ आणि मिचेल स्टार्क यांना दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी तंदुरुस्त होण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. यामुळे तो भारताविरुद्धच्या मालिकेसाठी उपलब्ध होईल.

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांची टी-20 मालिका 30 ऑगस्टपासून सुरू होत आहे. 1 आणि 3 सप्टेंबर रोजी आणखी 2 सामने खेळवले जातील. एकदिवसीय मालिकेबद्दल बोलायचे झाले तर हे सामने 7, 9, 12, 15 आणि 17 सप्टेंबर रोजी होणार आहेत. यानंतर 22 सप्टेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT