Steve Smith scores a double century in 4th test of ashes 2019 
क्रीडा

Ashes 2019 : सनसनाटी स्मिथचा डबल धमाका; आर्चरचा 'भोपळा' 

वृत्तसंस्था

मॅंचेस्टर : लॉर्डस कसोटीत जोफ्रा आर्चरचा चेंडू मानेवर लागून जायबंदी झालेल्या स्टीव स्मिथने चौथ्या कसोटीत सनसनाटी द्विशतक झळकावित इंग्लंडची नाकेबंदी केली. त्याने दोन डझन चौकारांसह 211 धावांची खेळी केली. आर्चरला पहिल्या डावात 97 धावांच्या मोबदल्यात एकही विकेट मिळाली नाही. 

दुसऱ्या दिवशी कांगारूंनी 8 बाद 497 धावसंख्येवर डाव घोषित केला. स्मिथने मालिकेत 500 धावांचा टप्पाही पार केला. 310 चेंडूंत त्याने द्विशतक पूर्ण केले. त्यानंतर हवेत उडी घेत त्याने पंच मारला आणि जल्लोष केला. 191 धावांवर असताना त्याने जॅक लीचला वाईड लॉंगऑफला षटकार खेचला. 199 धावांवर असताना मग स्टुअर्ट ब्रॉडच्या चेंडूवर दोन धावा घेत त्याने द्विशतक पूर्ण केले. अखेर कर्णधार ज्यो रूटने बदली गोलंदाज म्हणून चेंडू हातात घेतला आणि स्मिथला बाद केले. रीव्हर्स स्वीपचा प्रयत्न स्मिथला भोवला. 

स्मिथला 118 धावांवर जीवदान मिळाले होते. पहिल्या स्लीपमध्ये बेन स्टोक्‍सने त्याचा झेल घेतला होता, पण त्यापूर्वीच लीच याच्याकडून नोबॉल पडल्याचा इशारा झाला होता. 

30 वर्षीय स्मिथने पहिल्या कसोटीत दोन्ही डावांत अनुक्रमे 144 व 142 धावा केल्या होत्या. लॉर्डसवरील दुसऱ्या कसोटीत 92 ही त्याची सर्वांत कमी धावसंख्या आहे. त्याचे हे चालू मालिकेतील तिसरे, ऍशेसमधील 11 वे, तर कारकिर्दीतील 26 वे शतक आहे. स्मिथला दुखापतीमुळे तिसऱ्या कसोटीस मुकावे लागले होते. यानंतर स्मिथच्या मनोधैर्यावर परिणाम झाल्याचा किमान इंग्लंडच्या तज्ज्ञांचा कयास होता, पण स्मिथने तो चुकीचा ठरविला. 
ओल्ड ट्रॅफर्डवर दुसऱ्या दिवशी उपाहाराला ऑस्ट्रेलियाने 5 बाद 245 अशी मजल मारली होती. 3 बाद 170 वरून खेळ सुरू झाल्यानंतर पावसाचा व्यत्यय कायम राहिला, पण स्मिथने एकाग्रतेमध्ये आणि पर्यायाने फॉर्ममध्ये व्यत्यय येऊ दिला नाही. काल तो 60 धावांवर नाबाद होता.

पहिल्या दिवसाच्या तुलनेत इंग्लंडच्या गोलंदाजांनी नियंत्रित मारा केला, पण तरीही त्यांना स्मिथला शतकापासून रोखता आले नाही. स्टुअर्ट ब्रॉडने ट्रॅव्हिस हेडला, तर जॅक लीचने मॅथ्यू वेडला बाद केले. स्मिथने आर्चरचा खाली आलेला एक फुलटॉस मारला. त्यावेळी आर्चर अवघड झेल घेऊ शकला नाही. आर्चरने कसोटीत प्रथमच ताशी 90 मैल वेगाने मारा केला, पण स्मिथ भक्कम राहिला. 

संक्षिप्त धावफलक 
ऑस्ट्रेलिया : पहिला डाव : 126 षटकांत 8 बाद 497 घोषित (मार्कस हॅरीस 13, डेव्हिड वॉर्नर 0, मॅर्नस लाबूशेन 67-128 चेंडू, 10 चौकार, स्टीव स्मिथ 211-319 चेंडू, 24 चौकार, 2 षटकार, ट्रॅव्हीस हेड 19, मॅथ्यू वेड 16, टीम पेन 58-127 चेंडू, 8 चौकार, मिचेल स्टार्क नाबाद 54-58 चेंडू, 7 चौकार, 2 षटकार, नेथन लायन नाबाद 26-26 चेंडू, 4 चौकार, स्टुअर्ट ब्रॉड 3-97, आर्चर 17-3-97-0, स्टोक्‍स 10.5-0-66-0, जॅक लीच 2-83, क्रेग ओव्हर्टन 2-85, रुट 1-39) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA 5th Test: शुभमन गिलची पाचव्या सामन्यातून माघार; Sanju Samson ला आता तरी मिळेल जागा, की गौतम गंभीर करेल प्रयोग?

Child Rappelling Kokankada : शिवरायांची वाघीण! कोकणकड्यावरून चिमुकलीचं थरारक रॅपलिंग; महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाची आद्याश्री तरी कोण?

Latest Marathi News Live Update : नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाला बॉम्ब धमकी; बॉम्बशोध पथक व डॉग स्कॉडकडून कसून तपास

Kolhapur Municipal : गुन्हेगारीचा थेट प्रवेश; महापालिका निवडणुकीत गुंड-मटकेवाल्यांची बायकांसाठी उमेदवारीची धडपड

Mutual Fund Rule: मोठी बातमी! म्युच्युअल फंड आणि स्टॉक ब्रोकर्ससाठी नियम बदलले, सेबीचा ऐतिहासिक बदल

SCROLL FOR NEXT