Steve Waugh most selfish player Shane Warne  Sakal
क्रीडा

वॉर्नला कधी काळचा जिगरी मित्र स्टिव वॉ स्वार्थी वाटण्यामागचे कारण...

सकाळ डिजिटल टीम

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्न (Shane Warne) आणि माजी कर्णधार स्टिव वॉ (Steve Waugh) या दोन क्रिकेटर एकेकाळी एकमेकांचे जिगरी मित्र होते. पण एक काळ आला आणि दोन सच्चे मित्रांमध्ये मोठी दरी निर्माण झाली. त्यांच्यातील वाच्या अनेक चर्चा रंगल्याचे ऐकायला मिळाले. क्रिकेटच्या मैदानात यांच्यात चांगलीच खुन्नस होती. शेन वॉर्नने माजी कर्णधाराची वेळोवेळी फिरकीही घेतल्याचे पाहायला मिळाले. स्टिव वॉला क्रिकेट जगतातील सर्वात यशस्वी कर्णधार मानले जाते. सर्वाधिक कसोटी जिंकण्याचा पराक्रम त्याने करुन दाखवलाय. पण या आकड्या पलीकडे जाऊन वॉर्नने स्टिव वॉला उघड्यावर पाडण्याचा प्रयत्न केला. स्टिव वॉ सारखा स्वार्थी कोणीच नाही, अशा शब्दांत वॉर्नरने त्याची फिरकी घेतली होती. यामागेचा किस्सा सुरु झाला तो 1999 च्या एका दौऱ्यातून. (Steve Waugh most selfish player Shane Warne writes in his autobiography)

1999 मध्ये वेस्ट इंडीज दौऱ्यावरील अखेरच्या कसोटी सामन्यात शेन वॉर्नला संघातून डच्चू देण्यात आला होता. यावेळी तो उप कर्णधारही होता. संघातून वगळण्याचा कर्णधाराचा निर्णय त्याला चांगलाच खटकला होता. या कसोटी सामन्यात शेन वॉर्नच्या जागी कॉलिन मिलरला संधी देण्यात आली. तो सामना जिंकून ऑस्ट्रेलियान मालिकेत बरोबरी केली. पण वॉर्न आणि वॉ यांच्यात दुरावा आला. दोन दशकाहून अधिक काळ उलटला तरी त्यांच्यात गोडवा काही दिसला नाही.

स्टिव वॉ आवडत नाही याची अनेक कारणं आहेत. यात तो स्वार्थी असल्याचे एक आहे, असे शेन वॉर्न नेहमीच म्हणायचा. स्टिव वॉ ने 'आउट ऑफ माय कफर्ट झोन' या पुस्तकात शेन वॉर्नला बाहेर बसवण्याचा निर्णय घेणं कठिण होत असे म्हटलं होते. पण तरीही शेन वॉर्न त्याच्यावर कायमच बरसताना दिसले.

शेन वॉर्न याने 'नो स्पिन' या आपल्या पुस्तकातून वेस्ट इंडीज दौऱ्यावरील सामन्याचा उल्लेख करत माजी कर्णधारावर निशाणा साधला होता. वॉर्न ने पुस्तकात लिहिले होते की, त्यावेळी मी संघाचा उप कर्णधार होता. खांद्याच्या दुखापतीतून सावरत असल्यामुळे म्हणावी तशी गोलंदाजी होत नव्हती. पण मी हळूहळू लयीत येतोय अस त्याला सांगितले होते.

कोच मार्श आणि सिलेक्टर एलन बॉर्डर हे मला साथ द्यायला तयार होते. पण कर्णधाराने मला साथ दिली नाही, असे त्याने पुस्तकात लिहिले होते. कठिण काळात त्याने माझी साथ दिली नाही, हे कधीच विसरणार नाही, असा उल्लेखही वॉर्नने केला होता. मी त्याला नेहमी साथ दिली. तो माझा चांगला मित्र होता. तो माझ्या सोबत चुकीच वागला. स्टिव वॉनं माझ्यावर विश्वास दाखवला नाही, याची खंत कायम राहिल, असेच त्याचे शब्द आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

Crime News : कसबे सुकेणे हादरले! शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न, गावकऱ्यांनी आरोपींना दिला चोप

Thane News: मराठीसाठी लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास स्वराज्य विनामूल्य केस लढणार, ॲड. जय गायकवाड यांची भूमिका

Shravan Pradosh Vrat 2025: यंदाच्या श्रावणात किती प्रदोष व्रत आहेत? जाणून घ्या तारीखा आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT