क्रीडा

भारताकडून वनडेत विक्रमी कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूची निवृत्ती

सकाळ डिजिटल टीम

वनडे क्रिकेटमध्ये त्याने भारताकडून विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. अद्याप अशी कामगिरी एकाही भारतीय गोलंदाजाला करता आलेली नाही.

नवी दिल्ली - भारताचा क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नीने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. 37 वर्षीय स्टुअर्ट बिन्नी गेल्या चार वर्षांपासून सांघातून बाहेर होता. 2016 नंतर त्याने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नव्हता. मात्र, देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळून भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी त्याचा संघर्ष सुरु होता.

2014 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेट सामना खेळून त्याने आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केलं होतं. स्टुअर्ट बिन्नीने दोन वर्षात 6 कसोटी सामने, 14 वन डे आणि 3 टी ट्वेंटी सामने खेळले. यात त्याने वनडे क्रिकेटमध्ये भारताकडून विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. अद्याप अशी कामगिरी एकाही भारतीय गोलंदाजाला करता आलेली नाही. त्याने 2014 मध्ये बांगलादेशविरोधात 4 धावा देत 6 गडी बाद केले होते.

भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये कमी धावात 5 पेक्षा जास्त गडी बाद करण्याचा विक्रम त्याआधी अनिल कुंबळेच्या नावावर होता. अनिल कुंबळेने 12 धावात 6 गडी बाद केले होते. त्यानंतर आशिष नेहराने 23 धावात 6 तर कुलदीप यादवने 25 धावात 6 गडी बाद केले आहेत. मात्र स्टुअर्ट बिन्नीच्या विक्रमाच्या जवळ अजुनही कोणी पोहोचलेलं नाही. पदार्पणाच्या सुरवातीला चमकदार कामगिरी करणारा स्टुअर्ट बिन्नी नंतर मात्र संघात स्थान मिळवू शकला नाही.

बिन्नीच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 194 धावा आणि 3 बळींची नोंद आहे. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 230 धावा आणि 20 बळी, टी ट्वेंटीमध्ये 35 धावा आणि एका विकेटचा समावेश आहे. क्रिकेटच्या मैदानात बिन्नी याच वर्षी मार्च महिन्यात उतरला होता. त्याने 100 वा प्रथम श्रेणीतला सामना खेळला होता. तोच त्याच्या कारकिर्दीतला शेवटचा सामना ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT