stuart broad  sakal
क्रीडा

स्टुअर्ट ब्रॉडच्या पबला आग लागल्याने मोठे नुकसान, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

स्टुअर्ट ब्रॉडला जेव्हा पबमध्ये भीषण आग लागल्याची बातमी मिळाली तेव्हा त्याला धक्का बसला.

Kiran Mahanavar

Stuart Broad: इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरी कसोटी सध्या नॉटिंगहॅममध्ये सुरू आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड सध्या कसोटी सामन्यात व्यस्त आहे. त्यादरम्यान स्टुअर्ट ब्रॉडच्या पबला मागून भीषण आगी लागले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग कशी लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. स्टुअर्ट ब्रॉडला जेव्हा त्याच्या सह-मालकीच्या नॉटिंगहॅमशायर पबमध्ये भीषण आग लागल्याची बातमी मिळाली तेव्हा त्याला धक्का बसला.(stuart broad pub gutted by fire destroys)

ESPNcricinfo च्या वृत्तानुसार, ब्रॉडला शनिवारी सकाळी 6 वाजता बातमी मिळाली. आगीमुळे इमारतीचा पहिला मजला आणि छत उद्ध्वस्त झाले. पबला लागलेल्या आगीमुळे ब्रॉडचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेची छायाचित्रे त्याने स्वत: ट्विटरवर चाहत्यांसोबत शेअर केली आहेत. ट्विट करून ब्रॉनने आपले कर्मचारी आणि कठीण काळात मदतीसाठी आलेल्या लोकांचे आभार मानले आहे.

स्टुअर्ट ब्रॉडने ट्विट केले की, मला काही या बातम्यांवर विश्वास बसत नाही. आमच्या पबला आज सकाळी आग लागली. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. नॉटिंगहॅमशायर अग्निशमन सेवा अविश्वसनीय होती. त्यांचे प्रयत्न आणि बाकीच्या लोकांनी केलेल्या मदतीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो सर्वांचे आभार. आमच्या उत्कृष्ट कर्मचार्‍यांचा विचार करून, प्रत्येकाने समुदायासाठी एक खास पब तयार केला आहे.

दुसऱ्या कसोटीबद्दल बोलायचे झाले तर न्यूझीलंडचा पहिला डाव 553 धावांवर आटोपला आहे. स्टुअर्ट ब्रॉडने काईल जेम्सन आणि टिम साउथीला आपला बळी बनवले. प्रत्युत्तरात इंग्लंडने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 107 धावांवर दोन गडी गमावले होत्या. तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने १-० अशी आघाडी घेतली आहे. यजमानांनी पहिली कसोटी पाच गडी राखून जिंकली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivshahi Bus: एसटीच्या ‘शिवशाही’ला कायमचा ब्रेक लागणार! आता MSRTC च्या 'या' बसेस रस्त्यावर धावणार; प्रशासनाचा मोठा निर्णय

Who is Auqib Nabi? रणजी स्पर्धेत ५५ विकेट्स घेणारा, वेगाचा नवा बादशाह... दिनेश कार्तिकने केले कौतुक; भारतीय संघात तो हवा...

Company Bonus Video: पैसेच पैसे! टेबलावर ठेवले २४० कोटी अन् म्हणाला मोजता येतील, तेवढे उचला

T20 WC, WI vs SA: विंडीजने दाखवली ताकद, शेफर्ड - होल्डरची विश्वविक्रमी भागीदारी अन् द. आफ्रिकेसमोर मोठं लक्ष्य; भारताची धाकधुक वाढली

Horoscop : उद्या 27 फेब्रूवारीला खास योग! 'या' 3 राशींना होणार धनलाभ; नोकरी-व्यवसायात मिळेल मोठी संधी, पण वैवाहिक जीवनात होईल त्रास

SCROLL FOR NEXT