Sunil Gavaskar Ishan Kishan
Sunil Gavaskar Ishan Kishan esakal
क्रीडा

Sunil Gavaskar : हे क्रिकेट नाही! सुनिल गावसकर इशान किशनवर जाम भडकले

अनिरुद्ध संकपाळ

Sunil Gavaskar Ishan Kishan : भारत आणि न्यूझीलंड याच्यांतील पहिला वनडे सामना जबरदस्त झाला. भारताने पहिल्या डावात विजयासाठी किवींसमोर 350 धावांचे आव्हान ठेवले होते. किवींनी झुंजार खेळ करत हा सामना 6 बाद 131 धावांवरून शेवटच्या षटकापर्यंत नेला. न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्याच सामन्यात अनेक घटना घडल्या.

भारताचा विकेटकिपर इशान किशनने असे काही केलं की तो 14 चेंडूत 5 धावा करून देखील चर्चेत राहिला. मात्र इशान किशनच्या या कृतीवर भारताचे माजी प्रशिक्षक सुनिल गावसकर जाम भडकले. त्यांनी किशनला चांगलेच फैलावर घेतले.

इशान किशनने काय केले?

कुलदीप यादव डावातील 16 वे षटक टाकत होता. समोर न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम फलंदाजी करत होता. इशान किशन विकेटच्या एकमद जवळ उभे राहून विकेटकिपिंग करत होता. लॅथमने जेव्हा कुलदीपचा पहिला चेंडू खेळला त्यावेळी इशान किशनने बेल्स पाडल्या. मात्र यावेळी किशनच्या हातात चेंडू नव्हता. यानंतर कहर करत किशनने आऊटचे अपिल देखील केले.

मात्र टॉम लॅथम क्रिजच्या आत उभा होता. रिप्लेमध्ये देखील तेच दिसले. रिप्लेनंतर इशान किशन हसताना दिसत होता. टॉम लॅथमविरूद्धची इशान किशनची अपिल फेल गेली त्यावेळी समालोचन करत असलेल्या सुनिल गावसकर यांनी किशनच्या या कृतीवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, 'बेल्स पाडणे इथपर्यंत ठीक होतं मात्र इशान किशनने अपिल करायला नको होती. त्याने जे केले ते क्रिकेट नाही.'

भारताने न्यूझीलंडविरूद्धचा पहिला वनडे सामना 12 धावांनी जिंकला. भारताकडून शुभमन गिलने 208 धावांची तडाखेबाज द्विशतकी खेळी केली. तर मोहम्मद सिराजने 4 आणि कुलदीप यादवने 2 विकेट्स घेतल्या. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना आता 21 जानेवारीला रायपूर येथे होणार आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: महायुतीचे उमेदवार पियुष गोयल उद्या उमेदवारी अर्ज भरणार

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Shilpa Shetty: शिल्पाच्या मुलाला पंजुर्लीने दिला आशीर्वाद! काय आहे शिल्पाचं कांतारा कनेक्शन ?

Big Discount: केंद्रानंतर 21 राज्यांनी केली घोषणा! जुनी कार स्क्रॅप करून नवीन कारवर मिळेल 50 हजारांची सूट

SCROLL FOR NEXT