sunil gavaskar birthday cricket legend  esakal
क्रीडा

सुनील गावस्कर जन्मानंतर एका कोळिणीच्या घरी पोहोचले अन्...

'सनी डेज' या आत्मचरित्रात गावस्कर यांनी आपल्या जन्माचा किस्सा शेअर केला आहे.

धनश्री ओतारी

भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर आज ७३ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म 10 जुलै 1949 रोजी मुंबईत महाराष्ट्रात झाला. गावसकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक विक्रम मोडले. 10,000 कसोटी धावा करणारा तो पहिला फलंदाज होता. गावसकर यांनी 1971 ते 1987 पर्यंत भारतीय संघाकडून क्रिकेट खेळले. आता तो कॉमेंट्री करताना दिसतात. त्यांच्या वाढदिवसानिमीत्त जाणून घेऊया त्यांच्या जन्माची गोष्ट...(sunil gavaskar birthday cricket legend)

'सनी डेज' या आत्मचरित्रात गावस्कर यांनी आपल्या जन्माचा किस्सा शेअर केला आहे. काही वर्षांपूर्वी 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स' कार्यक्रमात बोलतानाही गावस्कर यांनी ही अनोखी घटना सांगितली होती.

सुनील गावसकर यांचा जन्म झाला तेव्हा ते आई-वडिलांपासून वेगळे झाले होते. हा प्रकार रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे घडला. जन्मादरम्यान बाळाची देवाणघेवाण होते. कर्मचार्‍यांनी गावस्कर यांच्या आईला दुसरे मूल दिले होते. आईने त्यांनी जन्मखुणामुळे ओळखले. काही तासानंतर गावस्कर एका कोळिणीच्या घरी मिळाले.

ही गोष्ट आहे 1949 मधली. दादरचं पुरंदरे नर्सिंग होममध्ये10 जुलै रोजी गावस्करांचा जन्म झाला. दुसऱ्या दिवशी जनरल वॉर्डात असलेल्या मायलेकाला भेटायला बाळाचे नानाकाका अर्थात नारायण मसुरेकर आले. तान्ह्या बाळाला हातात घेतल्यानंतर हे आपलं नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

बाळाच्या डाव्या कानाला लहानसं छिद्र होतं. ते छिद्र दिसत नसल्याने हे बाळ आपलं नाही हे त्यांनी सांगितलं. लहान बाळांना आंघोळ घातली जाते तेव्हा अदलाबदली झाल्याचे काही वेळात स्पष्ट झालं.

आपलं बाळ शोधण्यासाठी त्यांनी शोध सुरू केला. दरम्यान, मासेमारी करणाऱ्या कोळिणीच्या समाजाच्या महिलेकडे गावस्कर असल्याचे लक्षात आलं. आणि गावस्करांना त्यांच्या आईकडे सोपवण्यात आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

What is the E20 Petrol Mandate 2026? पेट्रोलचे नियम बदलणार! तुमच्या गाडीत 'हे' इंधन भरण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अन्यथा...

श्रीदेवींच्या निधनामागे स्ट्रिक्ट डायट कारणीभूत? बोनी कपूरांचा खुलासा, म्हणाले...'ती मीठचं खात नव्हती'

HSC Exam Paper Leak : केमिस्ट्री, फिजीक्सनंतर बारावीचा गणिताचा पेपर फुटला; नागपुरात घडला प्रकार, सीलबंद लिफाफ्यातून प्रश्नपत्रिका गायब?

Medha Mankumre Point Accident : मेढ्यातील मानकुमरे पॉइंटजवळ उलटली कार; पाचवड-खेड हायवेवर नेमकं काय घडतंय? ठेकेदाराच्या 'या' चुकीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात!

Marathi Bhasha Gaurav Din: 27 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो मराठी भाषा गौरव दिन? जाणून घ्या महत्त्व आणि इतिहास

SCROLL FOR NEXT