Sunil Gavaskar says Shane Warne was not greatest Spinner
Sunil Gavaskar says Shane Warne was not greatest Spinner esakal
क्रीडा

शेन वॉर्न हा काही सर्वोत्तम फिरकीपटू नव्हता : सुनिल गावसकर

सकाळ डिजिटल टीम

जागतिक क्रिकेटमध्ये कसोटीत 708 पेक्षा जास्त विकेट घेणाऱ्या शेन वॉर्नचे (Shane Warne) 52 व्या वर्षी निधन झाले. त्याची निधनाची बातमी येताच संपूर्ण क्रिकेट जगत हळहळले. अनेक आजी माजी क्रिकेटपटूंनी, चाहत्यांनी शेन वॉर्नच्या दर्जेदार फिरकी गोलंदाजीच्या आठवणींना उजाळा दिला. मात्र भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकरांच्या (Sunil Gavaskar) मते शेन वॉर्न हा जगतील सर्वोत्त फिरकीपटू (Greatest Spinner) नव्हता. त्यांच्या या दाव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Sunil Gavaskar says Shane Warne was not greatest Spinner)

सुनिल गावसकर इंडिया डुडेशी बोलताना म्हणाले की, '24 तासात क्रिकेट जगताने (Cricket World) दोन दिग्गज खेळाडू गमावले. हा धक्का फक्त ऑस्ट्रेलियन क्रिकेटला (Australian Cricket) नाही तर संपूर्ण जगाला बसला. रोडने मार्श आणि शेन वॉर्न यांचे एकाच दिवशी निधन झाले. हे अविश्वसनीय आहे. हे पचवणेच अवघड आहे.'

गावसकर पुढे म्हणाले की, 'शेन वॉर्नने अवघड अशा लेग स्पिनवर (Leg Spin) महारत मिळवली होती. त्याने कसोटीत मिळवलेल्या 700 तर वनडे क्रिकेटमध्ये शेकडो विकेट्स तो किती चांगला गोलंदाज होता हे दाखवून देतात. फिंगर स्पिन गोलंदाजी करणे सोपे असते. तेथे तुम्हाला तुमच्या गोलंदाजीवर चांगले नियंत्रण ठेवता येते. लेग स्पिन किंवा मनगटी फिरकीपटूंसाठी (Wrist Spinner) नियंत्रण मिळवणे तितकेसे सोपे नसते. मात्र ज्या प्रकारे शेन वॉर्नने गोलंदाजी केली त्याचा संपूर्ण क्रिकेट जगत आदर करते.'

असे असले तरी गावसकर शेन वॉर्नला सर्वोत्तम फिरकीपटू (Greatest Spinner) मानत नाहीत. याबद्दल गावसकर म्हणाले, 'माझ्या दृष्टीने भारतीय फिरकीपटू आणि मुथय्या मुरलीधरन हे शेन वॉर्न पेक्षा चांगले गोलंदाज होते. तुम्ही शेन वॉर्नचे भारताविरूद्धचे रेकॉर्ड बघा. ते सर्वसाधारणच आहे. भारतीय खेळाडू फिरकी गोलंदाजी खेळण्यात तरबेज असतात. त्यांच्याविरूद्ध शेन वॉर्नला फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे त्याला ग्रेट म्हणणे योग्य नाही. मुरलीधरनने (Muttiah Muralitharan) भारताविरूद्ध मिळवलेले यश हे मी वॉर्नपेक्षा वरचढ मानतो.'

गावसकर यांनी शेन वॉर्नचा अचानक झालेला मृत्यू हा त्याच्या लाईफ स्टाईलमुळे झाला असे वक्तव्य देखील केले होते. त्यावेळी भारतीय चाहत्यांना सुनिल गावसकर यांची वॉर्नचा मृत्यू झाल्यानंतर केलेली ही कमेंट फारशी रूचली नव्हती. गावसकर म्हणाले होते, शेन वॉर्न हा आपले आयुष्य पूर्णपणे जगत होता. तो किंग साईज (King Size Life) म्हणतात तसे आयुष्य जगला. त्याची ही जीवनशैली (Lifestyle) त्याच्या ह्रदयाला पेलवली नसावी. त्यामुळेच त्याचा लवकर मृत्यू झाला.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Latest Marathi News Live Update : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांनी कसली कंबर

SCROLL FOR NEXT