Sunil Gavaskar Rohit Sharma WTC Final  esakal
क्रीडा

Sunil Gavaskar Rohit Sharma : उद्या अजून काही मागाल... गावसकरांनी कारणे देणाऱ्या रोहितवर काढला जाळ

अनिरुद्ध संकपाळ

Sunil Gavaskar Rohit Sharma WTC Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 धावांनी पराभव करत आपले पहिले WTC अजिंक्यपद पटकावले. सामना झाल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने पराभवाची कारणे सांगताना WTC Final च्या स्वरूपावरच टीका केली होती. त्याने सामना इंग्लंडमध्येच का? सामना जूनमध्येच का? तीन सामन्याची मालिका का खेळवण्यात येऊ नये? असे प्रश्न उपस्थित केले होते. यावर भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनिल गावसकर यांनी प्रतिक्रिया देताना रोहितला चांगलेच फैलावर घेतले.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने चौथ्या डावात भारतासमोर विजयासाठी 444 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारताचा दुसरा डाव 234 धावात गुंडाळला गेला. यानंतर रोहित शर्मा पत्रकारांशी बोलताना म्हणाला की, 'मला WTC Final साठी तीन सामन्यांची मालिका खेळायला आवडेल. आम्ही खूप कष्ट केले आहेत आणि आम्ही लढलो देखील. मात्र आम्ही फक्त एक सामना खेळला. मला वाटते की पुढच्या WTC Cycle मध्ये फायनलसाठी 3 सामन्यांची मालिका योग्य ठरले.'

रोहितने मांडलेल्या मुद्द्याबाबत सुनिल गावसकर यांनी इंडिया टूडेशी बोलताना आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, 'नाही! हे खूप आधीच ठरलं होतं. तुम्हाला याबाबत WTC Cycle चा पहिला सामना खेळण्यापूर्वीच फायनल ही एकाच सामन्याची होणार आहे हे माहिती होत. त्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या तयार रहायला हवं होतं.'

गावसकर पुढे म्हणाले की, 'तुम्ही जसं आयपीएलसाठी तयारी करता तसं इथं होणार नाही. प्रत्येकाचे एक किंवा दोन दिवस खराब जातात. मात्र सामन्याचा पहिला चेंडू टाकण्यापूर्वीच तुम्हाला माहिती होतं की WTC फायनल कशी खेळली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही तीन सामन्यांची मालिका मागू शकत नाही. उद्या तुम्ही पाच सामन्यांची मालिकेची मागणी कराल.'

कसोटीच्या शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाने भारताचे 7 फलंदाज 70 धावात माघारी धाडले. स्टॉट बोलँडने विराट कोहली आणि रविंद्र जडेजाला माघारी धाडत भारताच्या उरल्या सुरल्या आशा देखील धुळीस मिळवल्या होत्या. भारताला 2013 पासून आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. गेल्या WTC Final मध्ये देखील न्यूझीलंडने भारताचा पराभव केला हातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तान पुन्हा बनतोय 'दहशतवादाचा कारखाना'; जैश-लष्करचे तब्बल 300 नवे अड्डे उभारण्याची तयारी, कोण देतंय इतका पैसा?

हत्तीच्या हल्ल्यात पतीचा मृत्यू, ६ लाखांची नुकसान भरपाई; ६ महिलांचा दावा, म्हणतात,'मीच खरी पत्नी'

AUS vs SA, ODI: १८ षटकार अन् ३६ चौकार! हेड, मार्श अन् ग्रीन बरसले, ऑस्ट्रेलिया ४०० पार; अनेक विक्रम मोडले

Latest Marathi News Updates : साईबाबांच्या लाडू प्रसादामध्ये संस्थानकडून 50 टक्के वाढ

Ganpati Bappa 2025: गणपती बाप्पाला दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या कारण आणि महत्त्व

SCROLL FOR NEXT