sunil gavaskar gave big statement about umran malik debut 
क्रीडा

'मी सचिननंतर मलिकची वाट पाहतोय' सुनील गावसकर असं का म्हणाले?

मी आत्तापर्यंत कोणाची वाट पाहिली असेल तर तो सचिन तेंडुलकर होता

Kiran Mahanavar

दक्षिण आफ्रिकेने रविवारी पाच सामन्यांच्या T20I मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा 4 विकेटने पराभव केला. यासह आफ्रिकेने पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताला आता अशा परिस्थितीत मालिका जिंकायची असेल तर उर्वरित तीन सामने जिंकावे लागतील. अशातच अजूनही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी न मिळालेल्या वेगवान युवा गोलंदाज उमरान मलिकची चर्चा अधिक रंगली आहे.(sunil gavaskar gave big statement about umran malik debut)

टीम इंडियाचे माजी क्रिकेटर सुनील गावसकर यांनी वेगवान युवा गोलंदाज उमरान मलिकची वाट पाहत असल्याचे म्हटलं आहे. ते म्हणाले, मी आत्तापर्यंत कोणाची वाट पाहिली असेल तर तो सचिन तेंडुलकर होता. आणि आता त्याच्यानंतर मी युवा गोलंदाज उमरान मलिकची वाट पाहत आहे. विशेष म्हणजे सर्व क्रिकेटप्रेमीदेखील त्याची वाट पाहत आहेत.

सुनील गावसकर असं का म्हणाले?

जम्मूच्या या वेगवान गोलंदाजाने आयपीएल 2022 मध्ये सातत्याने 150 kmph च्या वेगाने गोलंदाजी केली होती. हे पाहता त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या भारतीय संघात स्थान मिळाले. मात्र टीम इंडियाने त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये अद्याप स्थान दिलेल नाही. दिल्लीत 9 जून रोजी झालेल्या पहिल्या सामन्यात खेळला गेला नव्हता. हा पहिला सामना भारताने 7 विकेट्सनी गमावला, त्यानंतर आता दुसऱ्या सामन्यात तरी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले जाईल अशी अपेक्षा होती. मात्र, तसे काही घडलेच नाही.

दुसर्‍या टी-20 सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकली आणि भारताला प्रथम फलंदाजी करायला सांगितले. कटकच्या बाराबती स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकात 6 गडी गमावून 148 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने हे लक्ष्य 18.2 षटकांत 6 गडी गमावून पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT