Sunil Gavaskar Prithvi Shaw esakal
क्रीडा

Sunil Gavaskar Prithvi Shaw : निवडसमितीला जागं करायचं असेल तर... गावसकरांनी पृथ्वी शॉला दिला गुरूमंत्र

अनिरुद्ध संकपाळ

Sunil Gavaskar Prithvi Shaw : मुंबईच्या पृथ्वी शॉने रणजी ट्रॉफी सामन्यात विक्रमी 379 धावांची खेळी केली. या खेळीमुळे पृथ्वी शॉने भारतीय संघातील दावेदारी पुन्हा एकदा ठोकली. पृथ्वी शॉच्या या धडाकेबाज खेळीनंतर त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. शॉची 379 धावांची खेळी ही मुंबईकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये केलेली सर्वोच्च खेळी ठरली. यानंतर भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी देखील पृथ्वी शॉचे कौतुक केले. याचबरोबर त्याला टीम इंडियातील आपले स्थान पुन्हा पटकावण्यासाठी एक गुरूमंत्र देखील दिला.

सुनिल गावसकर पृथ्वी शॉला म्हणाले की, 'अशाच प्रकारची कामगिरी त्याच्याकडून अपेक्षित होती. तो चांगल्या 60 - 70 धावा करत होता. मात्र 60 - 70 धावा तर भरपूरजण करतात. जर तुला निवडसमितीचे खरोखर लक्ष वेधायचं आहे तर द्विशतक, त्रिशतक ठोक. त्याने जवळपास 400 धावा केल्या. जर त्याने 400 प्लस धावा केल्या असत्या तर अजून भारी झालं असतं.'

सुनिल गावसकर पुढे म्हणाले की, 'मला असे वाटते की त्याने मुंबईची अवस्था थोडी अवघड करून ठेवली होती. संघाला पहिला डाव घोषित करायचा की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला असणार. शॉ भाऊसाहेब निंबाळकरांच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळीचा ( नाबाद 443 धावा) विक्रम मोडण्याच्या जवळ पोहचला होता. हा एक अवघड निर्णय होता.'

(Sports Latest News)

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT