Sunil Gavaskar Neeraj Chopra esakal
क्रीडा

Sunil Gavaskar : पुढच्या 10 - 15 वर्षात भारत स्पोर्टिंग देश होईल... नीरजच्या सुवर्णपदकानंतर गावसकरांचं मोठं वक्तव्य

अनिरुद्ध संकपाळ

Sunil Gavaskar Neeraj Chopra : जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राने भारताला पहिले वहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. गेल्या स्पर्धेत त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. नीरज हा जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत दोन पदके जिंकणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला आहे.

नीरजच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारताच्या अनेक क्रिकेटपटूंनी नीरजचे अभिनंद केले आहे. भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनिल गावसकर यांनी देखील नीरजच्या कामगिरीचे कौतुक केले.

यावेळी बोलताना सुनिल गावसकर यांनी भारताच्या क्रीडा क्षेत्राबद्दलही एक मोठं वक्तव्य केलं. ते म्हणाले की, येत्या 10 ते 15 वर्षात भारत देखील स्पोर्टिंग देश म्हणून ओळखला जाईल.

सुनिल गावसकर यांनी नीरज चोप्राने सुवर्ण पदक जिंकल्यानंतर पीटीआयशी बोलताना आपले मत व्यक्त केले. गावसकर म्हणाले की, 'खूप आनंद झाला. भारताचे इतर खेळ देखील चांगली कामगिरी करत आहेत. नीरजला आपण यापूर्वीही पाहिलं आहे. त्याने जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते.'

'नीरजने यावेळी सुवर्ण पदक जिंकणे गरजेचे होते. आज त्याने सुवर्ण पदक पटकावले आहे. यामुळे इतर खेळाडूंना देखील प्रेरणा मिळते. तुम्ही पाहिलं असेल की यावेळेच्या स्पर्धेमध्ये नीरजसोबत अजून दोन भारतीय भालाफेकपटू फायनलमध्ये पोहचले होते.'

सुनिल गावसकरांनी भारतीय क्रीडा क्षेत्राबद्दल एक मोठे वक्तव्य देखील यावेळी केले. ते म्हणाले की, 'एखादा खेळाडू चांगली कामगिरी करतो त्यावेळी तो खेळ खेळणाऱ्या इतर खेळाडूंना प्रेरणा मिळते. सध्या खेळाडूंना ज्या प्रकारे संधी मिळत आहे ते पाहते मला वाटते की, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाकडे जसं स्पोर्टिंग नेशन म्हणून पाहिलं जातं तसं कदाचित 10 ते 15 वर्षात भारताबद्दलही तसं बोललं जाऊ शकतं.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : कोल्हापुरात माॅन्सूनचे धडाक्यात पुनरागमन; पुढच्या काही तासांत मुंबईसह अमरावती, कोकणात पावसाचा जोर वाढणार; कुठे ऑरेंज तर कुठे येलो अलर्ट

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणात दोषी ठरलेल्या भीमराव कांबळेला आज विशेष न्यायालय शिक्षा सुनावणार

Ketan Agarwal Killed Case : घटनास्थळी प्रसंगाची पुनर्निर्मिती; लोहगडावर पुतळ्याच्या साह्याने गुन्ह्याची अडीच तास पुनर्तपासणी

Anant Ambani : अनंत अंबानी यांची तिरुमलात सुप्रभात सेवा

Iran America War : आखातात पुन्हा भडका! बहारीन, कुवेतवर क्षेपणास्त्र हल्ले; अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणचे चोख उत्तर

SCROLL FOR NEXT