sunil gavaskar esakal
क्रीडा

Sunil Gavaskar : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पराभवात लाज वाटण्यासारखं काही नाही, गावसकरांनी दिला युवा खेळाडुंना सल्ला

Kiran Mahanavar

Ind vs Wi T20i Series Sunil Gavaskar : भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडिज दौरा काही चांगला राहिला नाही. खरंतर, कसोटी मालिका 1-0 ने जिंकल्यानंतर टीम इंडियाने एकदिवसीय सामन्यात यजमानांचा 2-1 असा पराभव केला. पण टी-20 मालिकेत पराभवचा सामना करायला लागला.

टी-20 मालिकेत पहिले दोन सामने गमावल्यानंतर टीम इंडियाने पुनरागमन करत 2-2 अशी बरोबरीत आणली, पण शेवटचा सामना जिंकून वेस्ट इंडिजने 3-2 अशी मालिका जिंकली.

युवा खेळाडूंनी चांगली कामगिरी केली पण वैयक्तिकरित्या. संघाचा टी-20 मालिकेत फॉर्ममध्ये दिसत नाही. भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी टी-20 निकाल पाहिल्यानंतर एक विधान केले.

गावसकर एका मुलाखतीत म्हणाले, एखादा खेळाडू फ्रँचायझीकडून खेळताणा चांगली कामगिरी करू शकतो, परंतु जेव्हा देशासाठी खेळण्याचा विचार येतो तेव्हा दबाव आणि अपेक्षा वाढतात. येथे सर्वोत्तम खेळाडू देखील संघर्ष करतात. 19 वर्षांखालील खेळाडू वरिष्ठ संघात प्रगती करू शकत नसताना आपण हे किती वेळा पाहिले आहे. यशस्वी जैस्वाल यांच्याशिवाय तिलक वर्मा आणि मुकेश कुमार या तीन खेळाडूंनी टीम इंडियासाठी टी-20 मालिकेत पदार्पण केले.

गावसकर म्हणाले की, मुलांना लहान मुलासोबत खेळायला आवडते. जेव्हा ते वरिष्ठ संघाविरुद्ध खेळतात, तेव्हा त्यांना अचानक लक्षात येते की अंडर-19 स्तरावर ती गोष्ट केकच्या तुकड्यासारखी दिसते, पण वरिष्ठ संघात तो वेगळा आहे.

गावसकर पुढे म्हणाले की, “वेस्ट इंडिजविरुद्धच्या पराभवामुळे कोणी नाराज होऊ नका. हे विसरू नका की त्यांनी दोनदा ICC टी-20 विश्वचषक जिंकला आहे आणि त्यांचे खेळाडू IPL मध्ये खेळत असलेल्या विविध फ्रँचायझींचे मॅच विनर्स आहेत. म्हणूनच ते वरचेवर आहेत. चांगल्या टी-20 संघाकडून पराभूत होण्यात लाजिरवाणी गोष्ट नाही. भारताला आपली भूमिका मजबूत करण्यासाठी कोणत्या क्षेत्रात सुधारणा करणे आवश्यक आहे याचा हा इशारा असू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anuskura Ghat Road Repair : कोकण-पश्चिम महाराष्ट्र प्रवास आता सुसाट! अणुस्कुरा घाटातील 25 किमी रस्त्याचे होणार मजबुतीकरण, 5 कोटींचा निधी मंजूर

Mumbai: दत्तक प्रक्रियेवर निर्णय देण्यास जिल्हाधिकारीही सक्षम, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Latest Marathi News Live Update : सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला; बँकिंग क्षेत्रावर दबाव

Maharashtra Forest Land: राज्य सरकारचा निर्णय! वनजमिनींच्या नोंदी अद्ययावत होणार, प्रकल्पांना मिळणार गती, जिल्हाधिकाऱ्यांना काय दिले आदेश..

Parbhani News: केशर १२०, दशहरी १००, कर्नाटकी हापूस १५० रुपये किलो;परभणीच्या फळबाजारात आंब्याच्या दरात घसरण; सर्वसामान्यांना दिलासा

SCROLL FOR NEXT