Sunil Gavaskar On Shubman Gill  esakal
क्रीडा

Sunil Gavaskar On Shubman Gill : शुभमन करत काय होता... सुनिल गावसकर गिलवर का भडकले?

अनिरुद्ध संकपाळ

Sunil Gavaskar On Shubman Gill : भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनिल गावसकर यांनी युवा क्रिकेटर शुभमन गिलला चांगलेच फैलावर घेतले. गावसकरांच्या मते शुभमन गिलने इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात सेट होऊन आपली विकेट फेकली.

गिलने कसोटीच्या दुसऱ्या दिवशी 14 धावांपासून पुढे खेळण्यास सुरूवात केली. मात्र तो 23 धावांवर पोहचल्यानंतर मिड विकेटला झेल देऊन परतला. त्याने 66 चेंडू खेळले त्यात फक्त दोन चौकार मारले. त्याला स्ट्राईक रोटेट करण्यात देखील अडचण येत होती. त्यामुळे गावसकर गिलवर जाम भडकले. त्यांनी त्याच्या शॉट सिलेक्शनवर प्रश्न उपस्थित केला.

गावसकर जिओ सिनेमावर बोलताना म्हणाले की, 'तो कोणत्या प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय? जर तो हवेतून मारण्याचा प्रयत्न करत असता तर एकवेळ समजू शकलो असतो. मात्र त्याने एक खराब ऑन ड्राईव्ह खेळला. त्याने सर्व कष्ट केले, खेळपट्टीवर टिकून राहिला अन् असा शॉट खेळला.'

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर भारताने इंग्लंडच्या 246 धावांच्या प्रत्युत्तरात पहिल्या डावात 436 धावा केल्या. भारताकडून रविंद्र जेडजाने 87, केएल राहुलने 86 तर यशस्वी जयस्वालने 80 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून जो रूटने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. भारताने पहिल्या डावात 190 धावांची आघाडी घेतली असून. इंग्लंडने आपला दुसरा डाव सुरू केला आहे. त्यांनी तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात 1 बाद 89 धावांपर्यंत मजल मारली आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT