sunil gavaskar esakal
क्रीडा

IPL खेळता पण भारताकडून खेळताना...; विश्रांती घेणाऱ्या खेळाडूंवर गावसकर संतापले

सुनील गावसकर यांनी आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी वरिष्ठ खेळाडूंच्या विश्रांतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Kiran Mahanavar

भारताचा संघ वेस्ट इंडीजविरुद्ध तीन एकदिवसीय व पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची प्रकृती चांगली आहे, तरीही निवडकर्त्यांनी त्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 मालिकेसाठी, त्यानंतर आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी आणि आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी विश्रांती दिली आहे. माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी वरिष्ठ खेळाडूंच्या विश्रांतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. (Sunil Gavaskar Questions Why Seniors Rest During India Matches And Not IPL)

सुनील गावसकर एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, भारताच्या सामन्यांदरम्यान खेळाडूंनी विश्रांती घेणे मला अजिबात मान्य नाही. तुम्ही भारतासाठी खेळत आहात. तुम्ही आयपीएल दरम्यान विश्रांती घेत नाही, मग देशासाठी खेळण्यासाठी त्यांना विश्रांती का हवी आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहसह अनेक भारतीय स्टार्सना गेल्या काही महिन्यांत विश्रांती देण्यात आली आहे, ज्यामुळे बीसीसीआयच्या निवड धोरणावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीकडून बुधवारी वेस्ट इंडीजविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली. या संघात विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या, रिषभ पंत, मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्यात आली. मात्र वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी प्रमुख खेळाडूंचे भारतीय संघात पुनरागमन होईल. तसेच 11 जुलैला ही निवड करण्यात येईल, असे त्यांच्याकडून पुढे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction: डोळ्यांत अश्रू, बोलायला शब्द नाहीत… शिक्षकाच्या मुलावर IPL लिलावात कोट्यवधींचा वर्षाव, बापाचं स्वप्न साकार झालं

Yashasvi Jaiswal Hospitalized : यशस्वी जैस्वालची तब्येत बिघडली; पुण्यातील रुग्णालयात तातडीने करावं लागलं भरती; कशी आहे प्रकृती?

भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार, मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांकडून हल्ला; घटना CCTVमध्ये कैद

Latest Marathi News Live Update : वांद्रे–वरळी सी लिंकवर थरारक ड्रायव्हिंग, 250 किमी प्रतितास वेगाने कार चालवणाऱ्याविरोधात गुन्हा

Coinex Pune 2025 : दुर्मीळ नाण्यांचा खजिना बघण्याची पुणेकरांना संधी; ‘कॉइनेक्स पुणे २०२५’ शुक्रवारपासून

SCROLL FOR NEXT