Sunil Gavaskar Rishabh Pant Dinesh Karthik Hardik Pandya esakal
क्रीडा

Sunil Gavaskar : गावसकरांची आयडियाची कल्पना! पंत - कार्तिक दोघं खेळणार जर पांड्या...

अनिरुद्ध संकपाळ

Sunil Gavaskar Rishabh Pant Dinesh Karthik : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना जसजसा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे तसतसे भारताची प्लेईंग 11 कशी असेल याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत. प्लेईंग 11 मध्ये दिनेश कार्तिक खेळणार की ऋषभ पंत याबाबत खलबते सुरू आहेत. दरम्यान, भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी एक आयडियाची कल्पना लढवून हे दोघेही प्लेईंग 11 मध्ये कसे खेळू शकतात हे सांगितले.

रोहित शर्मा टी 20 वर्ल्डकप 2022 मधील आपला पहिला सामना रविवारी पाकिस्तानविरूद्ध खेळणार आहे. दरम्यान, या सामन्यासाठी भारताचे कॉम्बिनेशन कसे असले पाहिजे याबाबत सुनिल गावसकर यांनी आपले मत मांडले. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गावसकर म्हणाले की, 'जर टीम इंडिया सहा गोलंदाज घेऊन उतरणार असेल तर हार्दिक पांड्या हा त्यांचा सहावा गोलंदाज असेल. अशा परिस्थितीत ऋषभ पंतला प्लेईंग 11 मध्ये कदाचित जागा मिळू शकणार नाही. मात्र जर हार्दिक पांड्या पाचवा गोलंदाज म्हणून खेळला तर ऋषभ पंत सहाव्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून संघात खेळू शकतो. त्यानंतर दिनेश कार्तिक सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येईल. त्यानंतर चार गोलंदाज असतील. असे कॉम्बिनेशन होऊ शकते. मात्र यासाठी आपल्याला थोडा वेळ वाट पहावी लागले.'

गावसकर पुढे म्हणाले की, 'संघ व्यवस्थापन नक्कीच डावखुऱ्या फलंदजाला संघात स्थान देण्यास इच्छुक असणार आहेत. पंत चांगल्या फॉर्ममध्ये देखील आहे. कधी कधी तुम्ही विचार कराल की ऋषभ पंतला किती षटके फलंदाजी करायला मिळेल. त्याला तीन ते चार षटके खेळायला मिळतील का? तीन चार षटके राहिले असताना दिनेश कार्तिक की ऋषभ पंत या सर्व गोष्टींचा संघ व्यवस्थापनाला विचार करावा लागले आणि मग निर्णय घ्यावा लागले.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

Pali News : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा सूत्रधार शोधण्यासह इतर मागण्यांचे तहसीलदारांना अंनिसकडून निवेदन

School Blast: शाळेबाहेर स्फोटके! विद्यार्थ्याने फेकताच भीषण स्फोट, महिला आणि विद्यार्थी जखमी

Maharashtra Latest News Update: मंडणगडमधील महावितरणच्या जागेतील खैराची पुन्हा चोरी

SCROLL FOR NEXT