esakal
क्रीडा

वनडे मध्ये कसोटी ? सुनील गावस्करच्या त्या सुपरफ्लॉप इनिंगला आज ४७ वर्षे पूर्ण झाली

भारताच्या महान खेळाडूपैकी एक नाव म्हणजे सुनील मनोहर गावस्कर.

धनश्री ओतारी

भारताच्या महान खेळाडूपैकी एक नाव म्हणजे सुनील मनोहर गावस्कर ((Sunil Manohar Gavaskar). गावस्कर यांनी जगातील क्रिकेट खेळणाऱ्या देशांतील सर्वात जबरदस्त बॉलिंगचा सामना केला. त्यांनी कधी मागे फिरून बघितले नाही. सध्या त्यांचा एक किस्सा व्हायरल होत आहे.

४७ वर्षापूर्वी त्यांनी सुपरफ्लॉप इनिंग खेळली होती. ७ जून १९७५ ला संत खेळी खेळत गावस्कर यांनी इंग्लंडविरुद्ध लाजीरवाणा विक्रम आपल्या नावावर केला होता. आज त्याला ४७ वर्ष पूर्ण झाले आहेत.

१९७५ साली पहिला विश्वचषक खेळवण्यात आला. यामध्ये गावस्कर यांनी ७ जून १९७५ इंग्लंडच्या विरुद्ध १७४ चेंडूत नाबाद ३६ धावांची खेळी केली होती. या खेळीची आठवण आजही सर्वांना आल्याशिवाय राहत नाही.

गावस्कर यांच्या खेळीवर फक्त चाहतेच नाहीतर स्वत: सुनील गावस्कर देखील खूश नव्हते. अनेक वर्षांनंतर गावस्कर यांनी एका मुलाखती दरम्यान या खेळीबद्दल सांगितले होते. मी अनेकवेळा बाद होण्याचा प्रयत्न केला परंतु तसे झाले नाही, अनेकवेळा मी स्टंप सोडून फलंदाजी केली परंतु माझी विकेट पडली नाही असे सुनील गावसकर यांनी सांगितले होते.

१७४ चेंडूत नाबाद ३६ धावांची खेळी

१९७५ इंग्लंडच्या विरुद्ध १७४ चेंडूत नाबाद ३६ धावांची खेळी केली होती. गावस्कर यांची ती खेळी इतकी संथ होती की, ती पाहून क्रिकेट चाहत्यांच्या संयमाचा संपला होता. यादरम्यान त्यांची धावांची सरासरी 21 म्हणजेच 20.69 एव्हढी होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये गावस्करांच्या त्या खेळीत फक्त एकाच चौकाराचा समावेश होता, त्यामुळे कसोटी सामन्याची अनुभूती आली होती.

इंग्लंडविरुद्धच्या विश्वचषकातील पहिल्या सामन्यात त्यांनी त्या संथ खेळीची स्क्रिप्ट लिहिली होती. त्यावेळी एकदिवसीय सामना 50 ऐवजी 60 षटकांचा होता. इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात भारताचा दारुन पराभव झाला होता. इंग्लंडने हा सामना 202 धावांनी जिंकला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT