Sunil Gavaskar Sarfaraz Khan Selection Committee
Sunil Gavaskar Sarfaraz Khan Selection Committee esakal
क्रीडा

Sunil Gavaskar : फॅशन शोमध्ये जा! गावसकरांच्या सर्फराजला डावलणाऱ्या निवडसमितीला कानपिचक्या

अनिरुद्ध संकपाळ

Sunil Gavaskar Sarfaraz Khan Selection : भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी भारतीय वरिष्ठ संघाच्या निवडसमितीला चांगलेच फैलावर घेतले. त्यांनी चेतन शर्मांच्या अध्यक्षतेखालील निवडसमितीवर मुंबईचा फलंदाज सर्फराज खानच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करण्यावरून टीका केली.

सर्फराज खानने रणजी ट्रॉफीमध्ये शतकांचा रतीब घातला आहे. त्याने दिल्ली विरूद्ध सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी सामन्यात पहिल्या डावात शतकी खेळी केली. अनेक दिग्गज खेळाडूंनी सर्फराजला भारतीय कसोटी संघात स्थान मिळायला हवे असे मत व्यक्त केले आहे.

भारताचे दिग्गज माजी खेळाडू सुनिल गावसकर यांनी देखील सर्फराज खानला पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी निवडसमितीवर बोचऱ्या शब्दात टीका केली. ते म्हणाले की तुम्हाला जर स्लीम ट्रीम खेळाडूच पाहिजे असतील तर तुम्ही मॉडेल्सना देखील संघात घेऊ शकतो.

इंडिया टूडेला दिलेल्या मुलाखतीत गावसकर म्हणाले की, 'सर्फार खान शतकी खेळीनंतरही क्षेत्ररक्षणासाठी तो मैदानात उतरतो. हे तो एक फिट क्रिकेटपटू असल्याचेच संकेत आहेत ना. जर तुम्ही फक्त स्लिम आणि ट्रीम खेळाडूंनाच घेणार असाल तर तुम्ही फॅशन शोनमध्ये जायला हवे. तेथून तुम्ही काही मॉडेल्स निवडा आणि त्यांच्या हातात बॅट आणि बॉल देऊन त्यांना संघात सामील करा.'

गावसकर पुढे म्हणाले की, 'तुम्हाला प्रत्येक साईज आणि शेपमधील क्रिकेटपटू मिळतील. तुम्ही त्यांच्या साईजवरून त्याची निवड करू नका तर त्याने केलेल्या धावा आणि घेतलेल्या विकेट्सवर त्यांची निवड करा.'

सर्फराज खानची ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली नाही. त्यानंतर सर्फाराज खानने प्रतिक्रिया देताना सांगितले होते की तो सुरूवातीला खूप रडला होता.

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सर्फाराज खान म्हणाला की, 'ज्यावेळी संघ निवडीची घोषणा झाली त्यावेळी माझे नाव त्यात नव्हते. मी संपूर्ण दिवस खूप दुःखी होतो. ज्यावेळी मी गुवाहाटीतून दिल्लीकडे प्रवास करत होतो. मला खूप एकटं वाटत होतं, मी रडलो देखील.'

सर्फराज पुढे म्हणाला की, 'मी दिल्लीतून माझ्या वडिलांना फोन केला. ते माझ्याशी बोलले. मी त्यांच्यासोबतच सराव केला होता. त्यानंतर मला जरा बर वाटलं.'

चेतन शर्मांच्या अध्यक्षतेखालील निवडसमितीने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. अजून दोन कसोटी सामन्यांसाठी घोषणा होणे बाकी आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Bomb Threat: "दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार," पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे खळबळ

Swati Maliwal: '...तर सिसोदिया आज इथं असते...', आपच्या मोर्चाच्या निर्णयानंतर स्वाती मालीवाल यांचं ट्विट

Simple Hacks: कुलर सुरू असताना पण खोली दमट वाटते? थंडावा निर्माण करण्यासाठी वापरा 'या' ट्रिक्स

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

Singham Again: श्रीनगरमध्ये सुरुये 'सिंघम अगेन'चं शूटिंग; अजय देवगण आणि जॅकी श्रॉफ यांच्या अॅक्शन सीनचा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT