Sunil Gavaskar Statement About Joe Root Will Break Sachin Tendulkar Test Runs Record  esakal
क्रीडा

रूट सचिनचे वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याबाबत गावसकर काय म्हणाले?

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : सुनिल गावसकर हे भारताचे कसोटीत 10 हजार धावा पूर्ण करणारे पहिले फलंदाज आहेत. नुकतेच इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटने देखील कसोटीत 10 हजार धावा पूर्ण करण्याचा मान पटकावला. जो रूट सध्या कसोटीत शतकांचा रतीब घालत आहे. यामुळेच अनेक आजी माजी क्रिकेटर जो रूट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडणार का अशी चर्चा करत आहेत. यावर दिग्गज सुनिल गावसकर यांनी देखील आपले मत व्यक्त केले. (Sunil Gavaskar Statement About Joe Root Will Break Sachin Tendulkar Test Runs Record)

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सुनिल गावसकर म्हणाले की, 'ते एक सर्वात कठिण असे रेकॉर्ड आहे. आपण अजून जवळपास 6 हजार धावा करण्याबाबत बोलत आहोत. याचा अर्थ तुम्हाला पुढची 8 वर्षे 1000 ते 800 धावा कराव्या लागतील.'

गावसकर पुढे म्हणाले की, 'जो रूटचे वय त्याच्या बाजूने आहे. तो हे रेकॉर्ड मोडू शकतो जर त्याने धावा करण्याचा हा उत्साह कायम ठेवला तर. अॅलेस्टर कूक निवृत्तीनंतरही प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत आहे. तुम्ही खूप काळ खेळत असला त्यावेळी तुमचा फॉर्म देखील जाऊ शकतो. कारण तुम्हाला मानसिक थकवा येतोच. रूट सध्या 150 धावांपेक्षा जास्त धावा करत आहे. याचा कधी ना कधी त्याच्या मानसिकतेवर आणि शारीरिकदृष्ट्या देखील परिणाम होणार.'

दिग्गज सुनिल गावसकरांनी याबाबत सर्वाधिक कोसटी विकेटच्या विक्रमाचे उदाहरण दिले. ते म्हणाले, 'खेळात काहीही होऊ शकते. आपल्याला सुरूवातीला रिचर्ड हेडलींचे 431 विकेट्सचे रेकॉर्ड मोडले जाणार नाही असे वाटत होते. मात्र कर्टनी वॉल्श आला आणि त्याने 519 विकेट घेतल्या हा सिलसिला पुढे असाच सुरू आहे. त्यामुळे रेकॉर्ड मोडणे अशक्य नाही मात्र खूप खूप कठिण आहे.'

सचिन तेंडुलकरने 24 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. त्याने त्यात 200 कसोटी सामन्यांमध्ये 15921 धावा केल्या. त्याची सरासरी 53 आहे. सचिन हा एकमेव फलंदाज आहे ज्याने कसोटीत 50 पेक्षा जास्त शतके ठोकली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Iran War : युद्ध आणखीनच पेटले ! इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्रीही ठार, तेहरानमध्ये विध्वंस

Holi and Bhang Connection: होळीला प्यायली जाणारी भांग कायदेशीर असते का? वाचा कशी पडली परंपरा आणि पौराणिक कथा

IPL 2026 Schedule : गतविजेता RCB पहिल्याच सामन्यात MI किंवा CSK ला भिडणार? BCCI ने वेळापत्रकाबाबत दिले महत्त्वाचे अपडेट्स

Nashik Municipal Corporation : मनपाचा धडक 'सर्जिकल स्ट्राईक'; उंटवाडीतील गॅस रिफिलिंग अड्ड्यावर छापा, ५० सिलेंडर्स जप्त

Nashik Road Development : नाशिकच्या रस्त्यांचे भाग्य उजळणार: मनपा देणार 'बांधकाम टीडीआर', ३१ प्रभागांसाठी १४४ कोटींचा निधी!

SCROLL FOR NEXT