Supreme Court Issue Notices MS Dhoni In Amrapali Group Issue  esakal
क्रीडा

MS Dhoni : आम्रपाली ग्रुप प्रकरणी धोनीला सर्वोच्च न्यायालयाची नोटिस

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : आम्रपाली ग्रुप (Amrapali Group) आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) यांच्यात वादात आता सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महेंद्रसिंह धोनीला नोटिस बजावली आहे. हा वाद सोडवण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने मध्यस्थी समिती स्थापन केली होती. या समितीच्या सुनावणीवर स्थगिती आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे.

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. आम्रपाली ग्रुप आणि एमएमस धोनी यांच्यात आर्थिक देवाणघेवाणीचे प्रकरण सुरू आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. महेंद्रसिंह धोनीला आम्रपाली ग्रुपकडून 150 कोटी रूपयांचे येणे बाकी आहे. दुसरीकडे ग्रुपच्या ग्राहकांनी त्यांना फ्लॅट्स मिळाले नसल्याची तक्रार घेऊन सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

आम्रपाली ग्रुप आणि धोनी यांच्याशी निगडीत केस पहिल्यांना दिल्ली उच्च न्यायालयात सुरू होती. उच्च न्यायालयाने या प्रकरणी एका समितीची स्थापना देखील केली होती. या समितीचे नेतृत्व निवृत्त जस्टिस वीणा बीरबल करत होत्या. ज्यावेळी समिती स्थापन केली त्यानंतर पीडित ग्राहकांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत पीडित ग्राहकांकडून आम्रपाली ग्रुपकडे फंड नहीयेत त्यामुळे त्यांनी बुक केलेले फ्लॅट मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत.

पीडितांच्या म्हणण्यानुसार दिल्ली उच्च न्यायालयाने जी समिती स्थापन केली आहे त्याच्या समोर महेंद्रसिंह धोनीने आपल्या 150 कोटी रूपये येणे असल्याचा मुद्दा समोर ठेवला आहे. महेंद्रसिंह धोनी आम्रपाली ग्रुपचे ब्रँढ एबेसडर होता. त्याचे 150 कोटी रूपये त्याला अजून मिळालेले नाहीत. आता ग्राहकांनी जर आम्रपालीने धोनीला 150 कोटी दिले तर आम्हाला फ्लॅट मिळणार नाहीत.'

आता सर्वोच्च न्यायालयाने महेंद्रसिंह धोनी आणि आम्रपाली ग्रुपला नोटिस दिली आहे. या प्रकरणी त्यांना आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. सध्या तरी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीच्या सुनावणीवर स्थगिती दिलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT