Wrestlers Protest  Esakal
क्रीडा

Wrestlers Protest : भाजप खासदार ब्रिजभूषण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची दिल्ली पोलिसांना नोटीस

कुस्तीपटूंनी सुप्रीम कोर्टात काल धाव घेतली त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली

अंकिता खाणे (Ankita Khane)

भारतीय कुस्ती महासंघातील खेळाडूंवरून निर्माण झालेला वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रविवारपासून कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन सुरू केलं आहे. दरम्यान आता विनेश फोगट आणि इतर सात कुस्तीपटूंनी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

लैंगिक अत्याचाराचे आरोप झालेले भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर अडीच महिने उलटूनही कोणतीही कारवाई झाली नसल्याचा थेट आरोप खेळाडूंनी केला आहे. याविरोधात खेळाडूंनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.

त्यानंतर आज रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI)च्या अध्यक्षाविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी करणाऱ्या सात कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे.

कुस्तीपटूंचे म्हणणे होते की, ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, त्यामुळे खेळाडूंचे संपूर्ण करिअर, त्यांचे कुटुंब आणि भविष्य आता धोक्यात आले आहे. तरीही पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल करून घेतलेला नाही. तसेच क्रीडा मंत्रालय त्याच्यावर कोणतीही कारवाई करत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींना रक्षाबंधनला ३ हजार रुपये, पुन्हा सामाजिक न्याय विभागाकडून निधी वर्ग; राज्य सरकारचा मोठा निर्णय

IND vs SL 1st Test: गौतम गंभीरने खेळपट्टीची पाहणी केली, पाठ वळताच क्युरेटरने 'खेळी' खेळली; कॅप्टन, कोचने एकवटले... माईंड गेम

शूटिंगदरम्यान ज्युनिअर एनटीआरला झालेली गंभीर दुखापत; खांद्यावर झाली शस्त्रक्रिया, आता 2 ते 3 महिन्यांचा घेणार ब्रेक

IND vs SL: शुभमन गिल-रिषभ पंत श्रीलंकेत धुमाकूळ घालणार? WTC मध्ये आजपर्यंत कोणालाही न जमलेला पराक्रम करण्याची संधी

Latest Marathi News Live Update : तुम्ही मला अस्पृश्यासारखी वागणूक देता, 'शुद्धीकरण' करता आणि माझा अपमान करता."- खर्गे राज्यसभेत संतापले

SCROLL FOR NEXT