Greco-Roman Under-17 World Championship Suraj Vashisht ेोकोत
क्रीडा

शाब्बास पहिलवान! सुरज वशिष्ठने 32 वर्षांनी जिंकून दिलं गोल्ड मेडल

32 वर्षांनंतर अंडर-17 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कुस्तीत सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय कुस्तीपटू ठरला आहे.

Kiran Mahanavar

Greco-Roman Under-17 World Championship : भारताचा 16 वर्षीय कुस्तीपटू सूरज वशिष्ठने ग्रीको-रोमन अंडर-17 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. सूरजने 55 किलो वजनी गटात हे यश मिळवले. 32 वर्षांनंतर अंडर-17 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कुस्तीत सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय कुस्तीपटू ठरला आहे.

सूरज वशिष्ठने 55 किलो वजनी गटात हे यश मिळवले आहे. यासह 32 वर्षांनंतर अंडर-17 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कुस्तीत सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय कुस्तीपटू ठरला आहे. 1990 मध्ये पप्पू यादव चॅम्पियन झाला तेव्हा भारताने या स्पर्धेत शेवटचे सुवर्णपदक जिंकले होते.

सुरजने युरोपियन चॅम्पियन फरीम मुस्तफेववर 11-0 असा मोठा विजय मिळवला. सूरजने सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमणाला सुरुवात करत 1-0 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या हाफच्या सुरुवातीलाच त्यांनी 3-0 अशी आघाडी घेतली. युरोपियन कुस्तीपटूला पुनरागमनाची संधी नव्हती.

पप्पू यादव 1990 मध्ये चॅम्पियन झाल्यानंतर आणखी पाच भारतीय कुस्तीपटू अंतिम फेरीत पोहोचले, परंतु कोणालाही सुवर्णपदक मिळू शकले नाही. 32 वर्षांपासून सुरू असलेला हा दुष्काळ आता सूरजने संपवला आहे. इतिहास रचल्यानंतर सूरज म्हणाला, मला माझ्या वजन प्रकारात जगातील सर्वोत्तम कुस्तीपटू व्हायचे आहे. सीनियर वर्ल्ड जेतेपद हे माझे स्वप्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime: मराठी अभिनेत्रीसोबत एका रात्रीसाठी २ लाख; मुंबईत हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; समोर आली धक्कादायक माहिती

Property Tax : कर सवलतीची आजच संधी; मिळकतकर थकबाकीदारांवर उद्यापासून जप्तीची कारवाई

Latest Marathi News Live Update : जिल्हाधिकाऱ्यांच्या कथित बनावट सहीप्रकरणी मोठी कारवाई; चामोर्शी नगरसेवकाला ५ दिवसांची पोलीस कोठडी

Vat Purnima Heart Attack Death : पतीच्या दीर्घायुष्यासाठी पूजला वटवृक्ष; वाण देतानाच आला हृदयविकाराचा तीव्र झटका, सिंधुदुर्गातील 'या' सावित्रीचा दुर्दैवी अंत

Kas Plateau Flower Season : पर्यटकांसाठी मोठी अपडेट! कास पठारावर फुलांचा हंगाम कधीपासून सुरू होणार? यंदा काय असणार खास? वनविभागाची पूर्वतयारी सुरू

SCROLL FOR NEXT