suresh raina  sakal
क्रीडा

गदाधारी सुरेश रैना! चाहते म्हणाले, तरी ही धोनी संघात घेणार...

सुरेश रैना त्याच्या वर्कआऊटमुळे चांगलच चर्चेत आला आहे.

Kiran Mahanavar

भारताचा माजी फलंदाज सुरेश रैना (Suresh Raina) सध्या आपल्या फिटनेसकडे लक्ष देत आहे. सोशल मीडियावर त्याच्या वर्कआउटचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये तो गदा घेऊन वर्कआउट करताना दिसून येत आहे.

रैना अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे आणि ट्विटमुळे चर्चेत राहिला आहे. मात्र, आता तो त्याच्या वर्कआऊटमुळे चांगलच चर्चेत आला आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) लिलावात रैनाला कोणत्याही संघाने विकत घेतलेले नाही. नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये (IPL2022) तो खेळाडू म्हणून भाग घेऊ शकलेला नाही. मात्र, रैना कॉमेंट्रीच्या माध्यमातून आयपीएलशी आणि त्याच्या चाहत्यांशी जोडला गेला होता.

सुरेश रैनाने स्वत: गदा घेऊन वर्कआउट करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. रैनाच्या या व्हिडिओने कुस्तीपटूला तयारीची आठवण करून दिली आहे. रैनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. यावर चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, तरीही धोनी तुला संघात घेणार नाही.

आयपीएल 2022 पूर्वीच्या मेगा लिलावात सुरेश रैनावर 2 कोटी रुपयांच्या मूळ किंमतीसह कोणीही बोली त्याच्यावर लावली नाही. रैना आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा पाचवा खेळाडू आहे तर रैनाने 205 लीग सामन्यांमध्ये 5,528 धावा केल्या आहेत. या बाबतीत मात्र विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉर्नरच त्याच्या पुढे आहेत.

आयपीएल 2022 मध्ये सुरेश रैनाची अनुपस्थिती चेन्नई सुपर किंग्जला (CSK) चांगलीच खलवली. चार वेळा चॅम्पियन असलेल्या CSK ने 14 पैकी फक्त चार सामने जिंकले आणि गुणतालिकेत आपले नववे स्थान मिळवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Girish Mahajan: ‘तुमचे घोडे नेमके कुठे अडले, मला कळत नाही’; सावळीविहीर रस्त्याच्या प्रश्नावर गिरीश महाजन आक्रमक

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

SCROLL FOR NEXT