Surya Kumar Yadav esakal
क्रीडा

Surya Kumar Yadav : दुखापत फार गंभीर दिसत... सूर्यकुमार यादवच्या दुखापतीबाबत आली मोठी अपडेट

अनिरुद्ध संकपाळ

Surya Kumar Yadav Injury Update : भारताने दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा तिसरा टी 20 सामना तब्बल 106 धावांनी जिंकत मालिका 1 - 1 अशी बरोबरीत सोडवली. पहिला टी 20 सामना वॉश आऊट झाला होता. तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली होती.

तिसऱ्या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवने दमदार शतकी खेळी केली. त्याचे हे टी 20 क्रिकेटमधील चौथे शतक होते. सूर्याचं शतक आणि यशस्वीच्या 60 धावांच्या जोरावर भारताने 201 धावा केल्या होत्या. त्यानंतर कुलदीप यादवच्या भेदक माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेचा संघ 95 धावात पॅव्हेलियनमध्ये परतला.

दरम्यन, भारताच क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर उतरला त्यावेळी भारताचा कर्णधार सुर्यकुमार यादवच्या घोट्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावं लागलं. त्याच्या ऐवजी रविंद्र जडेजाने कॅप्टन्सी केली. सामना झाल्यानंतर खुद्द सूर्यकुमार यादवनेच आपल्या दुखापतीबाबत अपडेट दिली.

सूर्यकुमार सामन्यानंतरच्या संभाषणावेळी म्हणाला, 'मी बरा आहे मला चालता येत आहे त्यामुळे ही दुखापत फारशी गंभीर नाही. शतक करणं आणि त्यामुळे सामना जिंकणं कायमच भारी असतं. आम्ही धाडसी क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला अन् तो यशस्वी झाला. प्रत्येक खेळाडूने योगदान दिल्याने मी आनंदी आहे.'

कुलदीप यादवच्या कामगिरीबद्दल सूर्यकुमार म्हणाला की, 'कुलदीप कधीच 3 - 4 विकेट्स घेऊन खूश नसतो. त्याच्यासाठी वाढदिवसाचे हे उत्तम गिफ्ट आहे.'

सूर्यकुमार हा आता टी 20 क्रिकेटमध्ये तिसऱ्या किंवा त्यापेक्षा खाली फलंदाजी करताना सर्वाधिक शतक ठोकणारा खेळाडू ठरला आहे. ग्लेन या श्रेणीत तीन शतके ठोकली आहे. याचबरोबर सूर्याने इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गनचा टी 20 क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक अर्धशतके ठोकण्याचा विक्रम मागे टाकला. सूर्याने 39 डावात 15 अर्धशतके ठोकली आहेत. मॉर्गनने 105 डावात 14 अर्धशतके ठोकली होती.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Cyber Fraud: विधवेची सरकारी मदत सायबर भामट्याने लांबवली; सिम कार्डाच्या सहाय्याने खाते केले लिंक

Latest Marathi News Live Update : भारताच्या मीराबाई चानूनं रौप्य पदक पटकावलं

Beed News: पेट्रोलमध्ये आढळले पाणी; बीड शहरातील पंपावर नागरिक झाले संतप्त

RSS 100 Years : सोलापुरात २२७० स्वयंसेवकांचे पथसंचलन; अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी; राष्ट्रीय पंचसूत्रीची घोषणा

Pankaja Munde: पण, आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका;आरक्षणावरून पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे मत

SCROLL FOR NEXT