Suryakumar Yadav sakal
क्रीडा

Suryakumar Yadav : सूर्याने इतिहास रचला! एका वर्षात हजारी मनसबदारी!

टी-20 मध्ये एका वर्षात इतक्या धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज

Kiran Mahanavar

Suryakumar Yadav : भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव आता सध्या अप्रतिम क्रिकेट खेळत आहे. गेल्या वर्षी भारतासाठी पदार्पण करणारा सूर्या टी-20 मध्ये संघाचा आघाडीचा फलंदाज बनला आहे. चौथ्या क्रमांकावर खेळताना त्याची बॅट सतत धावा करत आहे. T20 विश्वचषक स्पर्धेतही त्याने भारतासाठी अनेक शानदार खेळी खेळल्या आहेत.

झिम्बाब्वे विरुद्ध क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये सूर्यकुमार यादवने इतिहास रचला आहे. सूर्यकुमार यादव आता टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात 1000 धावा करणारा भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी एका वर्षात भारतासाठी असा पराक्रम इतर कोणत्याही फलंदाजाने केला नव्हता.

जागतिक क्रिकेट मध्ये सूर्यकुमार यादव एका वर्षात 1000 धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी 2021 साली पाकिस्तान क्रिकेट संघाचा सलामीचा फलंदाज मोहम्मद रिझवानने ही कामगिरी केली होती. एवढेच नाही तर 2022 मध्ये तो टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण करणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे.

सूर्यकुमार यादवने झिम्बाब्वेविरुद्ध शानदार खेळी खेळत अवघ्या 23 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. या सामन्यात त्याने 24 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 55 धावा केल्या. या सामन्यात केएल राहुलच्या अर्धशतकी खेळीमुळे भारतीय संघाने 101 धावांवर 4 विकेट गमावल्या होत्या, परंतु सूर्यकुमारने पुन्हा आपल्या खेळीने भारतीय संघाला सांभाळण्याचे काम केले. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने 20 षटकांत 5 गडी गमावून 180 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT