Suryakumar Yadav becomes no1 T20I ESAKAL
क्रीडा

Suryakumar Yadav : सूर्याने रिझवानची संपवली मक्तेदारी; अव्वल स्थान घेतले हिसकावून

पाकिस्तानच्या रिझवानला मागे टाकून सूर्यकुमार यादव टी-20 मध्ये बनला नंबर वन

Kiran Mahanavar

Suryakumar Yadav : भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव हा क्रमवारीत जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज बनला आहे. पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानला मागे त्याने टाकले आहे. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत सूर्यकुमारचे 863 रेटिंग गुण आहेत. त्याचबरोबर रिझवानचे 842 रेटिंग गुण आहेत. सूर्यकुमारने रिझवानवर 21 रेटिंग गुणांची आघाडी घेत त्याची मक्तेदारी संपवली आहे

सूर्यकुमार यंदा टी-20 मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये खेळत आहे. या फॉरमॅटमध्ये तो या वर्षात सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही बनला आहे. 2022 मध्ये आतापर्यंत त्याने 27 सामन्यांत 42.50 च्या सरासरीने आणि 183.69 च्या स्ट्राइक रेटने 935 धावा केल्या आहेत. या वर्षी सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये एक शतक आणि आठ अर्धशतके झळकावली आहेत. त्याने यावर्षी इंग्लंडविरुद्ध 117 धावा केल्या होत्या.

सूर्यकुमारनंतर मोहम्मद रिझवान दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने यावर्षी 21 सामन्यांमध्ये 123.84 च्या स्ट्राइक रेटने 888 धावा केल्या आहेत. त्याचवेळी झिम्बाब्वेचा सिकंदर रझा तिसऱ्या क्रमांकावर आहे. रझाने यावर्षी 23 टी-20 सामन्यांमध्ये 151.40 च्या स्ट्राइक रेटने 701 धावा केल्या आहेत. विराट कोहली या वर्षी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या चौथ्या क्रमांकावर आहे. कोहलीने या वर्षी 18 सामन्यांमध्ये 140.08 च्या स्ट्राइक रेटने आणि 55.33 च्या सरासरीने 664* धावा केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Graded Driving License: काय आहे ग्रेड आधारित ड्रायव्हिंग लायसन्स? वाहतूक नियम भंग केल्यास रद्द होणार; नितीन गडकरी यांची घोषणा!

Latest Marathi News Live Update : पिंपरी चिंचवडमधील पूर्णत्वास आलेला पूल धोक्याचा

Gold Rate Today: सोनं-चांदीच्या भावात मोठा बदल! महाराष्ट्रात 1 तोळ्याचा भाव किती? पाहा आजचा ताजा भाव

Chandra Grahan 2026: गर्भवती महिलांनी चंद्रग्रहणाच्या वेळी 'या' गोष्टी टाळाव्यात

Pakistan Afghanistan Conflict : पाकिस्तानकडून अफगाणिस्तानविरुद्ध 'थेट युद्धा'ची घोषणा; काबुल आणि कंदहारमध्ये हवाई हल्ले

SCROLL FOR NEXT