Suryakumar Yadav Team India sakal
क्रीडा

Suryakumar Yadav: कसोटीतही टी-20ची पॅटर्न; सूर्याच्या स्ट्राईकरेटने निवड समितीची बोलतीच बंद

Kiran Mahanavar

Suryakumar Yadav Team India : बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत सूर्यकुमार यादव संघाचा भाग नाही. सूर्याची एकदाही कसोटी संघात निवड झालेली नाही. न्यूझीलंड दौऱ्यापासून तो विश्रांतीवर होता, मात्र आता तो दीर्घ विश्रांतीनंतर मैदानात परतला आहे. यावेळी त्याने अशा स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला ज्याचा तो गेल्या 3 वर्षांपासून भाग नव्हता.

सूर्यकुमार यादवने जवळपास तीन वर्षात पहिला रणजी सामना खेळताना 80 चेंडूत 90 धावांची खेळी केली. हैदराबादविरुद्धच्या रणजी ट्रॉफी गट ब गटातील सामन्यात त्याने 112.50 च्या स्ट्राईक रेटने 15 चौकार आणि 1 षटकार मारला. फेब्रुवारी 2020 मध्ये शेवटचा प्रथम श्रेणी सामना खेळलेल्या सूर्यकुमारने अनेकदा भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे, त्यामुळे त्याची ही खेळी निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेऊ शकते. भारताचा सर्वोत्कृष्ट टी-20 फलंदाज सूर्यकुमार याने लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये तीच आक्रमकता दाखवली ज्यासाठी तो लहान फॉरमॅटमध्ये ओळखला जातो.

2022 मध्ये सूर्यकुमार यादव हा टी-20 क्रिकेटमधील सर्वात यशस्वी फलंदाज ठरला आहे. या वर्षी त्याने 31 डावांमध्ये 46.56 च्या सरासरीने आणि 187.43 च्या स्ट्राइक रेटने 1,164 धावा केल्या. यादरम्यान त्याने 9 अर्धशतके आणि 2 शतके झळकली. सूर्यकुमार यादव या वर्षी टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याचबरोबर त्याने यावर्षी वनडेमध्ये 13 सामने खेळून 280 धावा केल्या आहेत. जरी तो अद्याप टीम इंडियासाठी एकही कसोटी सामना खेळू शकला नाही.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये सूर्यकुमार मुंबईकडून खेळत आहे. बीकेसी मैदानावर झालेल्या या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पृथ्वी शॉला (19) लवकर पॅव्हेलियनमध्ये गेला. यानंतर सलामीवीर यशस्वी जैस्वाल सूर्यकुमारसह दुसऱ्या विकेटसाठी 153 धावांची आणि रहाणेसोबत तिसऱ्या विकेटसाठी 206 धावांची भागीदारी करून मुंबईला मजबूत स्थितीत आणले. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत मुंबईने तीन गड्यांच्या मोबदल्यात 396 धावा केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Junnar Beef Seized: 'जुन्नरला चार गाई व दोन टन गोमांस जप्त'; जुन्नर पोलिसांची धडक कारवाई

Latest Marathi News Live Update: डाळी उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यास नाफेड मार्फत भारत सरकार ते खरेदी करणार-अमित शाह

OBC Reservation : धनगर समाजाने सत्ता काबीज करुन ओबीसींचं आरक्षण वाढवावं; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला

Mumbai Politics: तीन महिन्यांत ५ भेटी… ठाकरे बंधुंची युती पक्की की अजूनही चर्चा? पाहा सर्वात चर्चेत असलेली राजकीय भेटीची टाइमलाइन

Kojagiri Pournima 2025: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूर मार्ग मंगळवारपर्यंत बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

SCROLL FOR NEXT