suryakumar yadav  
क्रीडा

WI vs IND : BCCI ने काढून घेतली टेस्ट जर्सी, सूर्याने 'या' संघाकडे खेळण्याचा घेतला निर्णय

सूर्यकुमार यादवला कसोटी संघात संधी मिळाली नाही तर...

Kiran Mahanavar

WI vs IND 2023 Series : भारतीय क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाचा कसोटी आणि एकदिवसीय संघ जाहीर केला आहे. त्याचबरोबर वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाच्या संघात अनेक बदल पाहायला मिळाले आहेत. तर धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवला कसोटी संघातून वगळण्यात आले आहे.

सूर्यकुमार यादव त्यानंतर आता टीम इंडियाऐवजी दुसऱ्या टीमसोबत खेळताना दिसणार आहे. सूर्यकुमार यादवला कसोटी संघात संधी मिळाली नाही तर त्याची वनडे संघात निवड झाली आहे.

टीम इंडियात सूर्याला नाही मिळाले स्थान

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात डॅशिंग बॅट्समन सूर्यकुमार यादवचा स्टँडबाय म्हणून टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला होता. तर सूर्यकुमार यादवचाही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये संघात समावेश करण्यात आला होता. सूर्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केले होते. पण वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी संघात संधी मिळाली नाही. त्यानंतर आता सूर्यकुमार यादवने भारतीय संघाऐवजी दुसऱ्या संघासोबत खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

सुर्या दुलीप ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार

टीम इंडियात स्थान न मिळाल्याने भारतीय संघाचा घातक फलंदाज सूर्यकुमार यादवने आता दुलीप ट्रॉफी खेळण्याचा निर्णय घेतला आहे. आधी पण सूर्या दुलीप ट्रॉफीमध्ये पश्चिम विभागीय संघाकडून खेळताना दिसणार होता. तर सूर्यासह कसोटी संघातून वगळलेला वरिष्ठ फलंदाज चेतेश्वर पुजाराही या संघात खेळताना दिसणार आहे.

दुलीप ट्रॉफी 28 जूनपासून सुरू होणार असून ती 16 जुलैपर्यंत खेळवली जाणार आहे. यानंतर सूर्यकुमार यादव वेस्ट इंडिजला रवाना होईल कारण यानंतर त्याला वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळायची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT