Suryakumar Yadav India vs South Africa T20 World Cup 2022
Suryakumar Yadav India vs South Africa T20 World Cup 2022 esakal
क्रीडा

Suryakumar Yadav : झुंजार सूर्याने लाज राखली! भारताचे फक्त 3 फलंदाज पोहचले दुहेरी आकड्यात

अनिरुद्ध संकपाळ

India vs South Africa T20 World Cup 2022 : भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत 20 षटकात 9 बाद 133 धावांपर्यंत मजल मारली. दक्षिण आफ्रिकेच्या लुंगी एन्गिडीच्या भेदक माऱ्यासमोर भारताची टॉप ऑर्डर पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळली. त्यानंतर सूर्यकुमार यादवने एकाकी झुंज देत 40 चेंडूत 68 धावांची खेळी करत भारताला शतकी मजल मारून दिली. रोहितने 15 तर विराटने 12 धावा केल्या. या तिघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. आफ्रिकेकडून लुंगी एन्गिडीने 4 तर वेन पार्नेलने 3 विकेट्स घेतल्या.

एन्गिडीने भारताला पॉवर प्लेच्या पाचव्या षटकात पहिला धक्का दिला. त्याने कर्णधार रोहित शर्माला 15 धावांवर बाद केले. एन्गिडीने पाचव्या षटकात दुसऱ्या चेंडूवर सलामीवीर रोहित शर्माला बाद केले होते. त्यानंतर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने केएल राहुलला 9 धावांवर बाद करत भारताचा दुसरा सलामीवीर देखील माघारी धाडला.

यानंतर विराट कोहलीने आक्रमक फटकेबाजी करत भारताला पाठोपाठच्या दोन धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडीने राहुल, रोहित पाठोपाठ विराट कोहलीला देखील बाद करत भारताची अवस्था 3 बाद 41 अशी केली. विराट कोहली 2 चौकार मारत 11 चेंडूत 12 धावा करून माघारी परतला. भारताची पॉवर प्लेमध्येच 3 बाद 41 धावा अशी अवस्था झाली होती. आजच्या सामन्यात अक्षर पटेलच्या जागी संधी मिळालेल्या दीपक हुड्डाकडे हिरो होण्याची नामी संधी होती. मात्र तो नॉर्त्जेच्या चेंडूवर शुन्यावर बाद झाला.

एन्गिडी भारताची टॉप ऑर्डर उडवून शांत बसला नाही तर त्याने आपल्या तिसऱ्या षटकात हार्दिक पांड्याला देखील 2 धावेवर बाद करत भारताची अवस्था 5 बाद 49 धावा अशी केली. यानंतर सूर्यकुमार यादव आणि दिनेश कार्तिक यांनी डाव सावरला. सूर्यकुमार यादवने विकेट्स पडून देखील आपली आक्रमकता कुठेही कमी केली नाही. त्याने 30 चेंडूत 50 धावा ठोकत संघाला 15 व्या षटकात शतकी मजल मारून दिली.

सूर्यकुमार यादव आणि दिनेश कार्तिक यांनी सहाव्या विकेटसाठी 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र शेटवची 5 षटके राहिली असताना वेन पार्नेलने 15 चेंडूत 6 धावा करणाऱ्या दिनेश कार्तिकला माघारी धाडत ही जोडी फोडली. त्यानंतर स्लॉग ओव्हरमध्ये सूर्यकुमार फटकेबाजी करत असताना अश्विनने देखील 7 धावांची भर घालून सूर्याची साथ सोडली. त्यानंतर सूर्यकुमार देखील 19 व्या षटकात 40 चेंडूत 68 धावांची झुंजार खेळी करून परतला. अखेर भारताने 20 षटकात 9 बाद 133 धावांपर्यंत मजल मारली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

International Firefighters' Day 2024: एक दिवस खऱ्या सुपरहीरोंसाठी! आज साजरा केला जातो 'फायर फायटर डे'; कशी झाली सुरूवात?

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

MI vs KKR : गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांचे पाणी! IPL 2024 प्ले-ऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर

SCROLL FOR NEXT