Kapil Dev reaction on suryakumar yadav esakal
क्रीडा

Kapil Dev : श्रीलंकेला झोडणाऱ्या सुर्याबद्दल कपिल यांची कडक प्रतिक्रिया, 'तो म्हणजे...'

भारताला पहिला विश्वकरंडक मिळवून देणाऱ्या माजी वेगवान गोलंदाज कपिल देव यांना एका भारतीय फलंदाजानं भुरळ घातली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Kapil Dev on Suryakumar Yadav : भारताला पहिला विश्वकरंडक मिळवून देणाऱ्या माजी वेगवान गोलंदाज कपिल देव यांना एका भारतीय फलंदाजानं भुरळ घातली आहे. ते त्याच्या स्फोटक फलंदाजीनं प्रभावित झाले आहे. त्यांनी थेट त्याची तुलना व्हिव्हियन रिचर्डस, सचिन तेंडुलकर, यांच्या फलंदाजीशी केली आहे.

सोशल मीडियावर कपिल देव यांच्या त्या प्रतिक्रियेनं नेटकऱ्यांना व्यक्त होण्यास भाग पाडले आहे. त्याला कारणही तसेच आहे. त्यांनी एका फलंदाजाविषयी मोकळेपणानं आपली मतं मांडली आहे. तो कसा ग्रेट आहे, तो आपल्याला प्रभावित का करतो आणि आगामी काळात तो कशाप्रकारे साऱ्या भारतीयांना वेडं करेल याविषयी कपिल देव बोलले आहेत.

Also Read - योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

कपिल देव म्हणाले, तो जेव्हा खेळतो तेव्हा गोलंदाजांना प्रश्न पडतो की, त्याला गोलंदाजी कशी करावी, तो एक मोठा खेळाडू आहे. त्यानं गेल्या काही महिन्यात स्वताला सिद्ध केले आहे. कोणत्याही गोलंदाजाची गोलंदाजीची शैली ओळखणारा तो फलंदाज आहे. त्याचे नाव सुर्यकुमार यादव आहे. अशा शब्दांत कपिल देव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मी आता पर्यत जगातील वेगवेगळे फलंदाज पाहिले. ते सगळेच खास होते. त्यांची प्रत्येकाची काही खास वैशिष्ट्येही होती. पण सुर्याची गोष्टच वेगळी. मी ए बी डिव्हिलियर्स, व्हिव्हियन रिचर्डस, सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि रिकी पाँटिंग सारखे फलंदाज पाहिले. पण सुर्यकुमारला माझा सलाम. असे कपिल यांनी म्हटले आहे.

कपिल देव यांनी आपल्या खास शैलीमध्ये सुर्याचे कौतूक केले आहे. जेव्हा त्यांची ती प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली तेव्हा त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. फार कमी फलंदाज असे आहेत जे एखाद्या बॉलरला इतक्या सफाईदारपणे खेळू शकतात. त्यापैकी तो एक आहे. असे कपिल यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

SCROLL FOR NEXT