Suryakumar Yadav Dinesh Karthik Rohit Sharma esakal
क्रीडा

Suryakumar Yadav : सूर्याची चिंता वाढली; चौथ्या क्रमांकावर टांगती तलवार

अनिरुद्ध संकपाळ

Suryakumar Yadav Dinesh Karthik : भारत 6 ऑक्टोबरला टी 20 वर्ल्डकप खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होत आहे. यापूर्वी भारताने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरूद्धची टी 20 मालिका जिंकून आपली शस्त्रे पाजरून ठेवली. या दोन्ही मालिकेत भारताची फलंदाजी दमदार झाली. विशेष करून भारताचा चौथ्या क्रमांकाचा फलंदाज कोण हा प्रश्न मिटला. सूर्यकुमार यादवच्या रूपाने भारताला चौथ्या क्रमांकावर 360 डिग्री फलंदाज मिळाला आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात सर्वच चित्र पालटले.

रोहित शर्माने तिसऱ्या टी 20 सामन्यात ज्या फलंदाजांना जास्त फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही त्यांना वरच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवत मॅच प्रॅक्टिसची संधी दिली. रोहित शर्माने ऋषभ पंतला रोहितच्या अनुपस्थितीत सलामीला पाठवले. तर मॅच फिनिशनरची भुमिका बजावणाऱ्या दिनेश कार्तिकला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवत त्यालाही अधिक चेंडू खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली. दिनेश कार्तिकने या संधीचा फायदा उचलत 46 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याची फलंदाजी पाहून आता चौथ्या क्रमांकावर वर्ल्डकपसाठी भारतीय संघासमोर अजून एक पर्याय उपलब्ध झाला की काय असे वाटू लागले.

पोस्ट मॅच प्रझेंटेशनमध्ये सूर्यकुमार यादवने दिनेश कार्तिकच्या फलंदाजीचे कौतुक केले. याचबरोबर तो माझा फलंदाजीचा चौथा क्रमांक धोक्यात आला असल्याचे गंतमीने म्हणाला. सूर्यकुमार यादवने या वर्षात 50 सिक्स मारणार आहेस हे तुला माहिती होतं का असे विचारल्यावर म्हणाला की, 'खरं सांगू तर मी आकडे पाहत नाही. मला असं वाटतं की ती खेळाची गरज होती. माझे मित्र मला काही स्टॅट्स पाठवत असतात मात्र मी ते काही फॉलो करत नाही. माझी मानसिकता खूप स्पष्ट होती. मी फक्त खेळाचा आनंद घेऊ इच्छितो. माझी भुमिका ही भागीदारी रचण्याची असते. आज मात्र ते झालं नाही.'

सूर्यकुमार यादव दिनेश कार्तिकच्या खेळीबद्दल म्हणाला की, 'दिनेश कार्तिकला जास्तीजास्त काळ फलंदाजी करण्याची गरज होती. म्हणून त्याला चौथ्या क्रमांकावर पाठवण्यात आले. तो ज्या प्रकारे तो फलंदाजी करत होता. ते पाहून माझा फलंदाजीचा चौथा क्रमांक धोक्यात आला आहे असे वाटले. मी याचा फार विचार करत नाहीये.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT