Suryakumar Yadav Post sakal
क्रीडा

Suryakumar Yadav Post : रोहितच्या हकालपट्टीनंतर सूर्या चर्चेत... एका ट्वीटमुळे उडाली खळबळ

आयपीएल 2024 च्या आधी मुंबई इंडियन्सने एक मोठे पाऊल उचलले आणि...

Kiran Mahanavar

Suryakumar Yadav Post : आयपीएल 2024 च्या आधी मुंबई इंडियन्सने एक मोठे पाऊल उचलले. आयपीएल लिलावाच्या काही दिवस आधी मुंबईने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा मुंबई इंडियन्सचे चाहते कडाडून विरोध करत आहेत. कुणी मुंबई इंडियन्सची जर्सी जाळत आहे तर कुणी निषेध करत आहे.

दरम्यान, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारताचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादवच्या एका पोस्टने सोशल मीडियावर खळबळ उडाली. या पोस्टचे चाहते वेगवेगळे अर्थ काढत आहेत.

खरं तर, टीम इंडियाचा तुफानी फलंदाज सूर्यकुमार यादवने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक हृदय तुटलेले इमोजी शेअर केला आहे. यासोबत त्यांनी काहीही लिहिलेले नाही, मात्र त्यांचे चाहते या पोस्टवर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत.

काही चाहते म्हणत आहे की, सूर्यकुमारने रोहित शर्माने कर्णधारपद सोडल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे, तर काहींच्या मते सूर्यकुमारला मुंबई इंडियन्सने कर्णधारपद दिले नव्हते आणि यामुळे त्यांचे मन दुखले आहे.

रोहित आणि सूर्यकुमार हे दोघे खुप चांगले मित्र आहेत. हे दोन्ही खेळाडू बऱ्याच दिवसांपासून मुंबई इंडियन्सकडून खेळत आहेत. रोहितच्या नेतृत्वाखाली सूर्याने आयपीएलमध्ये यशाची चव चाखली आणि त्यानंतर टीम इंडियामध्ये धमाकेदार एंट्री केली. यामुळेच सूर्या त्याचा कर्णधार रोहितचा खूप आदर करतो आणि त्याच्याबद्दल आपुलकीही आहे.

रोहित हा आयपीएल इतिहासातील सर्वोत्कृष्ट कर्णधारांपैकी एक आहे, ज्याने आपल्या कार्यकाळात एमआयला विक्रमी पाच विजेतेपद मिळवून दिले. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला त्या यशाची पुनरावृत्ती करता आली नाही. 2022 टी-20 वर्ल्ड कप, वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिप 2023 आणि ICC वर्ल्ड कप 2023 मध्ये अपयशाचा सामना करावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Accident News : कोल्हापूरमध्ये सातेरीच्या दरीत पाचशे फुट चारचाकी कोसळली, वाहनात पती पत्नी; बचावकार्य सुरू

Arbaaz Khan Blessed with a Baby Girl: अरबाज खान पुन्हा बाबा झाला, शूराने दिला गोंडस मुलीला जन्म

Latest Marathi News Live Update : मनुवादी वकिलाचा CJIवर हल्ला लोकशाहीला घातक : रोहित पवार

भाजप आमदार तडीपार गुंडाच्या कार्यक्रमात, दमदाटी करणाऱ्यांना लाथा घालण्याचा 'सल्ला'; पक्ष अन् पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

कोणी तरी येणार येणार गं! भारती सिंग पुन्हा आई होणार, चाहत्यांना दिली गुडन्यूज, म्हणाली...'आम्ही पुन्हा प्रेग्नेंट'

SCROLL FOR NEXT