Suryakumar Yadav esakal
क्रीडा

Suryakumar Yadav : सूर्या होणार भारतीय संघाचा कर्णधार; संघ व्यवस्थापन प्लॅन बदलणार?

अनिरुद्ध संकपाळ

Suryakumar Yadav : भारतीय संघ वर्ल्डकपनंतर मायदेशातच ऑस्ट्रेलियासोबत टी 20 मालिका खेळणार आहे. या मालिकेला हार्दिक पांड्या मुकाला असल्याने संघाची धुरा कोण्याच्या खांद्यावर द्यायची हा मोठा प्रश्न संघ व्यवस्तापनासमोर होता.

सुरूवातीला सूर्यकुमार यादव वनडे वर्ल्डकप खेळत असल्याने त्याला विश्रांती देण्याचा प्लॅन संघ व्यवस्थापनाचा होता. मात्र आता हा प्लॅन बदलण्याचा विचार संघ व्यवस्थापन करत आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादव ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या टी 20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करण्याची शक्यता आहे. या मालिकेसाठीचा भारतीय संघ 19 नोव्हेंबरनंतर जाहीर होण्याची शक्यता आहे.

हार्दिक पांड्याच्या घोट्याचे लिगामेंट टिअर झाल्यामुळे तो वर्ल्डकपसह ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या मालिकेला मुकला आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार सूर्याच्या खांद्यावर भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा देण्याचा निर्णय झाला आहे.

ऑस्ट्रेलियाविरूद्धची टी 20 मालिका ही 5 सामन्यांची आहे. ही मालिका वर्ल्डकप संपल्या संपल्या अवघ्या 4 दिवसात सुरू होणार आहे. मात्र दोन्ही संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार आहे. मात्र त्यातील सूर्यासारखे काही खेळाडू हे ही मालिका खेळतील. सूर्यासोबतच इशान किशन आणि इतर खेळाडू देखील असतील.

ऑस्ट्रेलियाने या मालिकेसाठी आपला संघ वर्ल्डकप सुरू असतानाच जाहीर केला. मात्र बीसीसीआयने संघ जाहीर करण्यात घाई केलेली नाही. त्यांनी वर्ल्डकपमनंतर संघ घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी सेमी फायनलनंतर संघ जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र भारत आता फायनलमध्ये पोहचला आहे. आता संघाची घोषणा 20 नोव्हेंबरलचा होण्याची शक्यता आहे.

सूर्यकुमार यादव हा सध्या टी 20 मधील रँकिंगमधील पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आहे. तो ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेसाठी नेतृत्व करण्यास सर्वात योग्य उमेदवार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT