Sushilkumar
Sushilkumar 
क्रीडा

सुशीलचे पुनरागमन सहा मिनिटांचे

सकाळ वृत्तसेवा

जागतिक कुस्ती स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभव
नूर सुलतान (कझाकस्तान) - भारताचा दुहेरी ऑलिंपिक पदकविजेता आणि अनुभवी कुस्तीगीर सुशील कुमार याचे जागतिक अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धेतील पुनरागमन शुक्रवारी केवळ सहा मिनिटांचेच ठरले. स्पर्धेतील 73 किलो वजन गटातील पहिल्याच फेरीत त्याला अझरबैझानच्या खाडझीमुराद गादझीयेव याच्याकडून पराभव पत्करावा लागला.

यानंतर गादझीयेव याला उपांत्य फेरीत अमेरिकेच्या जॉर्डन अर्नेस्ट बुरोघकडून पराभव पत्करावा लागल्याने सुशीलचे रिपेचेजमधून आव्हान राखण्याचेही स्वप्न भंग पावले.

सुशीलने आपला अनुभव पणाला लावत लढतीला 9-4 अशी झकास सुरवात केली होती. मात्र, त्याला आपल्या लढतीतील वेग आणि सातत्य राखता आले नाही. आक्रमक राहिल्यानंतर काहिशा दमलेल्या सुशीलवर गादझीयेव याने प्रतिआक्रमण करत सलग सात गुणांची कमाई करताना 11-9 असा विजय मिळविला. सुशील लढतीच्या सुरवातीला 0-2 असा मागे पडला होता. मात्र, नंतर त्याने आक्रमकता आणताना पाठोपाठ दोनदा एकत्रित चार गुणांची कमाई केली. त्याच्या दुसऱ्या एकत्रित गुणाला प्रतिस्पर्धी प्रशिक्षकाने आव्हान दिले.

मात्र, पंचांनी रिप्ले पाहून ते फेटाळून लावल्यावर तो एक गुणही सुशीलला मिळाल्याने त्याने 9-4 अशी मोठी आघाडी मिळविली होती. दुसऱ्या फेरीत मात्र सुशील काहिसा दमला होता. याचा फायदा घेत गादझीयेव याने एकत्रित चार गुणांची कमाई केली. नंतर त्याच्यावर ताबा मिळवून दोन गुणांची कमाई केली आणि आघाडी घेतली. अखेरच्या काही मिनिटात त्याने आणखी एका गुणाची कमाई करताना विजय निश्‍चित केला.

सुशील पाठोपाठ 125 किलो वजनी गटात सुमीत मलिकही पहिल्याच फेरीत हंगेरीच्या डॅनिएल लिगेटीकडून 0-2 असा हरला. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत त्याचेही आव्हान संपुष्टात आल्याने सुमीतचा प्रवासही थांबला.

ऑलिंपिक गट नसलेल्या 70 किलो वजन गटात करण आणि 92 किलो वजन गटात प्रवीण या दोघांनाही पहिल्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. पुढे त्यांचे प्रतिस्पर्धीही पराभूत झाल्याने भारतीयांचे रिपेचेजचेही आव्हान संपुष्टात आले.

सातत्याने अपयशी
ऑलिंपिकमध्ये दोन पदके मिळविणारा 36 वर्षीय सुशील गेली वर्षभर सातत्याने अपयशी ठरत आहे. 2018 आशियाई क्रीडा स्पर्धेतही त्याला पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर तो बेलारुस येथील एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही उतरला होता. मात्र, तेथेही त्याला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. आता जागतिक स्पर्धेतही पुनरागमन त्याचे अपयशीच ठरले. जागतिक स्पर्धेत विजेतेपद मिळविणारा सुशील हा भारताचा एकमेव मल्ल आहे. त्याने 2010 मध्ये ही कामगिरी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT