Swapnil Kusale Won Bronze In 50m 3-Position Shooting At Paris Olympics 2024. Esakal
क्रीडा

Explainer: Swapnil Kusale नं मेडल जिंकलं ते 50 मी रायफल थ्री-पोझिशनचे सामने कसे खेळतात?

Paris Olympics 2024: स्वप्नीलने पदक जिंकल्याचा आनंद महाराष्ट्रासह देशभरात साजरा केला जात असला तरी, त्याने मेडल जिंकलेल्या 50 मी रायफल 3-पोझिशन खेळ प्रकाराबाबत खूप कमी लोकांना माहिती आहे.

आशुतोष मसगौंडे

यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होऊन अवघा एक आठवडा झाला आहे. या आठवड्याभरात भारताला शूटींगच्या वेगवेगळ्या प्रकारात तीन कांस्य पदके मिळाली आहेत.

यामध्ये आनंदाची बाब अशी की खाशबा जाधव यांच्यानंतर 72 वर्षांनी स्वप्नील कुसळेच्या रुपाने महाराष्ट्राच्या खेळाडूने ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावले आहे.

स्वप्नीलने पदक जिंकल्याचा आनंद महाराष्ट्रासह देशभरात साजरा केला जात असला तरी, त्याने मेडल जिंकलेल्या 50 मी रायफल थ्री-पोझिशन खेळ प्रकाराबाबत खूप कमी लोकांना माहिती आहे.

Swapnil Kusale And Khashaba Jadhav Olympics Medal Winners For India From Kolhapur, Maharashtra.

50 मी रायफल थ्री-पोझिशन म्हणजे काय?

50 मी रायफल थ्री-पोझिशन हा शूटींगमधील सर्वाधिक वेळ चालणार इव्हेंट आहे. यामध्ये शूटर तीन वेगवेगळ्या पोझिशनमध्ये शॉट्स शूट करतात.

यामध्ये स्टँडिंग (उभे राहून), नीलिंग (गुडघ्यावर) आणि प्रोन (झोपून) अशा तीन पोझिशन्स असतात. दरम्यान शूटरला प्रत्येक पोझिशनमध्ये शूट करताना त्याची रायफल आणि किट बदलावा लागतो.

थ्री-पोझिशन्सचे प्रकार

थ्री-पोझिशनच्या चार वेगवेगळ्या इव्हेट्सला इंटरनॅशनल शुटिंग स्पोर्ट फेडरेशन (ISSF) ची मान्यता आहे. यापैकी 50 मी रायफल थ्री-पोझिशन महिला आणि पुरूष अशा दोन प्रकारांमध्ये खेळली जाते. दोन्ही प्रकारामधील शूटर रिमफायर रायफलसह सहभागी होतात.

थ्री-पोझिशनच्या आणखी दोन इव्हेंट्स असलेल्या 300 मीटर रायफल आणि 300 मीटर स्टँडर्ड रायफलला मात्र, ऑलिम्पिकमध्ये स्थान नाही.

कसे निवडले जातात पदक विजेते

ऑलिम्पिकमध्ये, 2016 च्या ऑलिम्पिक स्पर्धेपर्यंत पात्रता फेरीत पुरूष स्पर्धक प्रत्येक पोझिशनमध्ये 40 शॉट्स मारायचे. तर महिलांना प्रत्येक पोझिशनमध्ये 30 शॉट्स मारता यायचे.

2018 मध्ये, हे नियम बदलण्यात आले त्यानंतर पुरुष आणि महिला खेळाडूंना पात्रता फेरीत प्रत्येक पोझिशनमध्ये 40 शॉट्स मारण्याची संधी बहाल करण्यात आली. यामध्ये पात्रता स्कोअर 1200 असतो. पात्रता फेरीनंतर, अव्वल आठ नेमबाज अंतिम फेरीत सहभागी होतात.

2020-21 मध्ये झालेल्या ऑलिम्पिक गेम्समध्ये प्रथम या नियमांची अंमलबजावणी झाली.

Swapnil Kusale At 50m 3-Position Shooting Event Paris 2024

यापूर्वी, यामध्ये स्टँडिंग पोझिशनमध्ये अतिरिक्त 10 शॉट्सचा समावेश असायचा, ज्यामध्ये सामन्याचा विजेता पात्रता आणि अंतिम फेरीतील एकत्रित गुणांच्या आधारे ठरवला जायचा.

पण, नंतर यात आणखी बदल करण्यात आले. पात्रता फेरीतील अव्वल आठ शूटरसाठी एक नवीन अंतिम स्वरूप सादर करण्यात आले.

पुरुष आणि महिला शूटर प्रत्येक पोझिशनमध्ये 15 असे अतिरिक्त 45 शॉट्स शूट करतात. यानंतर पात्रता फेरीतील स्कोअर बाजूला केला जातो.

यात प्रथम नीलिंग पोझिशनमधील 15 शॉट्स शूट केले जातात, त्यानंतर प्रोन पोझिशनमधील 15 आणि शेवटी 10 स्टँडिंग शॉट्स पूर्ण झाल्यानंतर आठपैकी शेवटच्या स्थानावर असलेल्या स्पर्धकाला बाहेर केले जाते.

पुढे प्रत्येक शॉटनंतर सर्वात खालच्या रँकिंगच्या शूटरला पुन्हा बाहेर काढले जाते आणि 15व्या शॉटमध्ये सुवर्ण आणि रौप्यपदक विजेते ठरतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT