Olympics 2024 Swapnil Kusale  sakal
क्रीडा

Olympic 2024: कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेनं साधला नेम! जिंकले Bronze मेडल, खाशाबा जाधवांच्यानंतर महाराष्ट्राला दुसरं ऑलिम्पिक पदक

Swapnil Kusale Wins Bronze Medal in Rifle Shooting 50m Olympic 2024 : क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठ्या महाकुंभात म्हणजेच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत तीन पदके जिंकली आहेत.

Kiran Mahanavar

Olympics 2024 Swapnil Kusale News: क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठ्या महाकुंभात म्हणजेच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत तीन पदके जिंकली आहेत. स्टार नेमबाज मनू भाकर आणि सरबज्योत सिंगनंतर पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या सहाव्या दिवशी कोल्हापुरच्या मराठमोळ्या स्वप्नील कुसाळे 50 मीटर रायफल 3 पोझिशन नेमबाजीत भारतला आणखी एक मेडल जिंकून दिले आहे.

1995 मध्ये महाराष्ट्राच्या कोल्हापुर मध्ये जन्मलेला स्वप्नील कुसाळेने पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये 451.4 गुण नोंदवून इतिहास रचला आहे. त्याने करिष्मा करत भारतासाठी कांस्यपदक जिंकले. पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे हे एकूण तिसरे पदक आहे. त्याच सोबत खाशाबा जाधवांच्यानंतर स्वप्नील कुसळेने महाराष्ट्राला दुसरे ऑलिम्पिक पदक जिंकून दिले आहे.

या सामन्यात चीनच्या लियू युकुनने 463.6 गुणांसह पहिले स्थान पटकावले. त्याचवेळी युक्रेनच्या सिरही कुलिशने 461.3 गुणांसह रौप्यपदक जिंकले.

भारताने आतापर्यंत जिंकली 2 पदके

यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात दोन पदक आहे. मनू भाकरने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये देशाला पहिले पदक मिळवून दिले. महिलांच्या या स्पर्धेत मनुने कांस्यपदक पटकावले. यानंतर मनुने सरबज्योत सिंगसोबत त्याच मिश्र स्पर्धेत आणखी एक कांस्यपदक जिंकले.

नेमबाजीत 2004 मध्ये ऑलिम्पिकमध्ये राज्यवर्धन राठोडने भारताला पहिले पदक मिळवून दिले होते. अथेन्स ऑलिम्पिकमध्ये त्याने हे पदक जिंकले. यानंतर अभिनव बिंद्राने बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकावर निशाणा साधला. 2012 मध्ये बीजिंग ऑलिम्पिकमध्ये दोन भारतीय नेमबाजांनी पदके मिळवली होती. विजय कुमारने रौप्य तर गगन नारंगने कांस्यपदक पटकावले.

यानंतर नेमबाजांना ऑलिम्पिक पदक जिंकण्यासाठी 12 वर्षे वाट पाहावी लागली. ऑलिम्पिकमध्ये 3 पदके जिंकून भारतीय नेमबाजांनी गेल्या काही वर्षातील अपयशाची भरपाई केली आहे. यावेळी भारतीय नेमबाजही भारताला सुवर्ण मिळवून देतील, अशी अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

गेटवर वाट बघत थांबलेला एकटा शूटर, ६ सेकंदात भाजप नेत्याची हत्या; CCTV फूटेज समोर

Latest Maharashtra News Updates : सहकार क्षेत्राला शैक्षणिक बळ देणारा ऐतिहासिक टप्पा : केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

SCROLL FOR NEXT