The sword of masculinity shining in the midst of difficulties; Radhika Avati ready 
क्रीडा

अडचणींची खिंड लढत तळपते मर्दानीची तलवार; राधिका आवटी सज्ज

घनशाम नवाथे

सांगली : पाचवीत असताना तिने कोवळ्या हातात तलवार उचलली. तलवारबाजीत तिला आवड निर्माण झाली. तिच्यातील कौशल्य प्रशिक्षकांनी हेरले. त्यानंतर तिची तलवार तळपतच राहिली. नववीत असताना तलवारबाजीसाठी शेकडो किलोमीटर दूर अनोख्या केरळ प्रांतात गेली. अनेक अडचणींवरही तिने आतापर्यंत सफाईदारपणे मात केली. आर्थिक पाठबळाची ढाल नसतानाही मर्दानी राधिका आवटी सध्या एशियन गेम व ऑलिंपिकसाठीची खिंड लढवत आहे. 


विविध देशांतील 21 आंतरराष्ट्रीय स्पर्धातून देशाला तीन सुवर्ण, वैयक्तिक रौप्य आणि तीन कास्य पदके, 37 राष्ट्रीय स्पर्धातून 15 सुवर्णपदके, 17 रौप्य आणि 15 कास्य पदकांची लयलूट करणाऱ्या राधिका आवटीने सध्या देशात फॉईल प्रकारात अव्वल स्थान मिळवले आहे.

गेल्या 14 वर्षांत अनेक आव्हानांना सामोरे जात तिने तलवार तळपत ठेवली आहे. तिचा इथपर्यंत जिद्दीचा प्रवास थक्क करणाराच म्हणावा लागेल. मूळचे अकिवाट (ता. शिरोळ) येथील आवटी कुटुंबीय राधिका आणि मोठा भाऊ अभिषेकच्या शिक्षणासाठी सांगलीत आले. नवकृष्णा व्हॅलीमध्ये पाचवीत शिकत असताना राधिकाने तलवार हाती घेतली. 


प्रशिक्षक सागर लागू यांनी तिच्यातील कसब हेरून तिला सज्ज केले. पहिल्याच वर्षी सब ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेत कास्य पदक मिळवले. सन 2006 मध्ये प्रशिक्षक लागू यांची स्पोर्टस्‌ ऍथॉरिटी ऑफ इंडिया (साई) च्या केरळ प्रशिक्षण केंद्रात निवड झाली. सन 2007 मध्ये नववीत शिकणाऱ्या राधिकाला त्यांनी करिअरसाठी केरळचे निमंत्रण दिले. आई-वडिलांनी धाडसाने पाठवलेदेखील. अनोख्या प्रदेशात केवळ तलवारबाजीतच नव्हेतर शिक्षणातही ती तळपत राहिली. दहावीत 85 टक्के व बारावीत 80 टक्के गुण मिळवले. केरळ विद्यापीठातून बी. ए. आणि तमिळनाडू विद्यापीठातून ती एम.बी.ए. झाली आहे. 

नोकरीपासून वंचित 

देशातील टॉपची तलवारबाज खेळाडू असलेल्या राधिकाला एशियन गेम्स आणि ऑलिंपिकमध्ये तलवार चालवून पदक मिळवायचे आहे. आर्थिक पाठबळीची कोणतीही ढाल नसताना अडचणींची खिंड लढवत ती खेळते. केवळ सुविधांमुळे केरळमधून ती खेळते. तेथून खेळत असल्यामुळे तिच्या कामगिरीकडे महाराष्ट्र राज्याचे दुर्लक्ष आहे. सुवर्णपदकांची लयलूट करूनही शासकीय नोकरीपासून ती वंचित आहे. 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT