T 20 India vs Australia cricket match on 23rd September at Jamtha Stadium nagpur sakal
क्रीडा

India vs Australia : तीन वर्षांनंतर रंगणार नागपुरात क्रिकेटचा सामना

जामठा स्टेडियमवर २३ सप्टेंबरला भारत-ऑस्ट्रेलिया लढत

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : : भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघादरम्यान तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरी लढत येत्या २३ सप्टेंबर रोजी विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा स्टेडियमवर खेळली जाणार आहे. या सामन्याच्या निमित्ताने तब्बल तीन वर्षांनंतर नागपुरात आंतरराष्ट्रीय सामना होणार आहे. बीसीसीआयने अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेचा कार्यक्रम घोषित केला. २० सप्टेंबरला मोहाली येथे पहिला सामना झाल्यानंतर २३ तारखेला नागपुरात दुसरा टी-२० सामना रंगणार आहे. तब्बल तीन वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय सामना होणार असल्याने नागपूरकर क्रिकेटप्रेमींसाठी एकप्रकारे मेजवानी राहणार आहे.

४५ हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या जामठा स्टेडियममध्ये आतापर्यंत १२ पुरुषांचे व दोन महिलांचे टी-२० सामने खेळले गेले आहेत. नागपुरात शेवटचा टी-२० सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात नोव्हेंबर २०१९ मध्ये खेळला गेला होता.

जामठा स्टेडियमवर झालेले टी-२० सामने

तारीख प्रतिस्पर्धी संघ विजयी संघ फरक

९-१२-०९ भारत-श्रीलंका श्रीलंका २९ धावा

८-३-१६ झिम्बाब्वे-हाँगकाँग झिम्बाब्वे १४ धावा

८-३-१६ अफगणिस्तान-स्कॉटलंड अफगणिस्तान १४ धावा

१०-३-१६ झिम्बाब्वे-स्कॉटलंड झिम्बाब्वे ११ धावा

१०-३-१६ हाँगकाँग-अफगणिस्तान अफगणिस्तान ६ गडी

१२-३-१६ अफगणिस्तान-झिम्बाब्वे अफगणिस्तान ५९ धावा

१२-३-१६ हाँगकाँग-स्कॉटलंड स्कॉटलंड ८ गडी

१५-३-१६ भारत-न्यूझीलंड न्यूझीलंड ४७ धावा

२५-३-१६ द. आफ्रिका-वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज ३ गडी

२६-३-१६ अफगणिस्तान-वेस्ट इंडीज अफगणिस्तान ६ धावा

२९-१-१७ भारत-इंग्लंड भारत ५ धावा

१०-११-१९ भारत- बांगलादेश भारत ३० धावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

Pune Hospital Row: टीकेच्या झंझावातात भिमाले माघारी; बाणेर कर्करोग रुग्णालयावरील वडिलांचे नावाचा फलक हटवला

Devgad Hapus AI : देवगड हापूस गुणवत्तेसाठी AI स्कॅनिंग मशीनला अनुदान द्यावे; राहुल शेवाळे यांची केंद्रीय कृषिमंत्र्याकडे मागणी

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मानवंदना

SCROLL FOR NEXT