virat kohali virat kohali
क्रीडा

कोहलीसाठी आयसीसी ट्रॉफी ठरते ‘विराट’; वाचा काय सांगतो ‘रेकॉर्ड’

नीलेश डाखोरे

मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने टी-२० विश्वकरंडक स्पर्धेनंतर टी-२० आंतरराष्ट्रीय संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे. या स्पर्धेनंतर तो केवळ कसोटी आणि एकदिवसीय संघाचेच नेतृत्व करणार आहे. त्यामुळे ‘कोहलीसाठी यंदाचा विश्वकरंडक जिंका’ अशी साद माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना याने घातली आहे. मात्र, विराटच्या नेतृत्वात भारतीय संघ खरच यंदाचा विश्वकप जिंकू शकतो का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, त्याच्या नेतृत्वात भारत आजपर्यंत एकही आयसीसी ट्रॉफी जिंकू शकलेला नाही.

विराट कोहली भारताचा प्रमुख फलंदाज आहे. तो चालला की भारताचा विजय पक्का असतो, असे म्हणतात. कारण, त्याची फटकेबाजी विरोधी संघाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करीत असते. आजच्या घडीला तो विश्वातील सर्वांत चांगल्या फलंदाजांमध्ये गणला जातो. त्याची फटकेबाजी पाहण्यासाठी प्रेक्षक मैदान गाठत असतात. तसेच तो भारतीय संघाचा सर्वांत यशस्वी कर्णधारही झाला आहे. असे असले तरी आयसीसीकडून आयोजिण्यात येणाऱ्या स्पर्धेत तो यशस्वी कर्णधार सिद्ध झालेला नाही.

विश्वचषकानंतर विराट टी-२०चे कर्णधारपद सोडणार आहे. यामुळे त्याला यंदा विजय मिळवून धोनीनंतर भारताला विश्वचषक मिळवून देण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. कारण, मागचे वाईट अनुभव त्याच्या स्मरणात नक्कीच असेल. त्याने आयपीएलचे कर्णधार पदवी सोडले आहे. त्याला आरसीबीला एकदाही विजय मिळवून देता आला नाही. त्यामुळे त्याच्या कामगिरीवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.

२०१७ ची चॅम्पियन्स ट्रॉफी

वर्ष २०१७ मध्ये पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. या स्पर्धेत भारताने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला होता. यानंतर पुन्हा एकदा भारताचा सामना पाकिस्तानशी झाला. या सामन्यात मात्र भारताला पराभवाचा सामना करावा लागला. पराभवच स्वीकारावा लागला नाही तर स्पर्धेतूनही बाहेर व्हावे लागले.

एकदिवसीय विश्वचषक २०१९

२०१९ मध्ये खेळला गेलेला एकदिवसीय विश्वचषक कर्णधार म्हणून विराट कोहलीचा पहिला विश्वचषक होता. हा विश्वचषक भारतच जिंकेल असे अनेक विरोधी संघाला वाटत होते. कारण, त्यावेळेस भारताचे सर्व खेळाडू चांगली कामगिरी करीत होते. नऊ सामन्यांपैकी आठ सामने जिंकून त्यांनी हे सिद्धही केले होते. परंतु, उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव करून स्पर्धेतून बाहेर केले.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप

आयसीसीकडून पहिल्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती. अपेक्षेप्रमाणे भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात धडक दिली. अंतिम सामना भारताला न्यूझीलंडविरुद्ध खेळायचा होता. विराट कोहलीसाठी कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे वर्चस्व आणखी वाढवण्याची सुवर्णसंधी होती. परंतु, न्यूझीलंडने भारताचा पराभूत करून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे पहिले विजेतेपद मिळवले. यामुळे त्याचे विजयाचे स्वप्न स्वप्नच राहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasant More Video: शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी..,दुबेंना मोरेंनी खडसावलं..

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

SCROLL FOR NEXT