t 20 world cup ben stokes and jofra archer get chance in england team sakal
क्रीडा

T20 World Cup : टी-२० विश्‍वकरंडक स्पर्धेत स्टोक्स, आर्चर खेळण्याची शक्यता

दोघांसाठी संघाचे दरवाजे नेहमीच उघडे असतील, असे स्पष्ट मत इंग्लंडच्या क्रिकेट संघाचे प्रशिक्षक मॅथ्यू मॉट यांनी गुरुवारी व्यक्त केले

सकाळ वृत्तसेवा

लंडन : अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स व वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर हे सध्या दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहेत; मात्र या दोन्ही प्रमुख खेळाडूंना इंग्लंडच्या टी-२० संघात स्थान देण्यात येईल.

या दोघांसाठी संघाचे दरवाजे नेहमीच उघडे असतील, असे स्पष्ट मत इंग्लंडच्या क्रिकेट संघाचे प्रशिक्षक मॅथ्यू मॉट यांनी गुरुवारी व्यक्त केले. मॅथ्यू मॉट हे इंग्लंडच्या टी-२० व एकदिवसीय संघाचे प्रशिक्षक आहेत. बेन स्टोक्स याच्या गुडघ्यावर नोव्हेंबर महिन्यात शस्त्रक्रिया करण्यात आली.

भारत-इंग्लंड यांच्यामध्ये आगामी काळात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचे आयोजन करण्यात येणार आहे. या महत्त्वाच्या मालिकेपर्यंत तो तंदुरुस्त होण्याच्या प्रयत्नात आहे. जोफ्रा आर्चर एल्बोच्या दुखापतीमुळे मार्च महिन्यापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही.

मॅथ्यू मॉट सध्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडच्या संघाला मार्गदर्शन करीत आहेत. या वेळी ते म्हणाले, बेन स्टोक्स हा अष्टपैलू खेळाडू आहे. तो मॅचविनर आहे. त्याच्यामुळे संघाचा समतोल राखला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sand Mining Ban: राज्यात अवैध वाळू उपसा बंद करण्याचे आदेश; मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका निकाली

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण मध्ये आज बंजारा समाजाच्या वतीने एल्गार मोर्चा काढण्यात आला

Dasara 2025: कंबरेला दोरी बांधून ७७ वर्षीय पुजाऱ्याने ओढल्या बारा बैलगाड्या; बिरोबाचा पारंपारिक दसरा महोत्सव

Shivaji Maharaj Video: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील रिझर्व बँक पाहिली का? व्हिडिओ व्हायरल

Video: रावणाची दहा डोकी घेऊन फिरत होती राखी सावंत, अशाच अवतारात छम्मक छल्लो गाण्यावर नाच नाच नाचली, व्हिडिओ बघून तुम्ही पण हसाल

SCROLL FOR NEXT