Rohit Sharma Rohit Sharma
क्रीडा

रोहित शर्मावर चोरीचा आरोप; खरचं हिटमॅन चोरी करू शकतो का?

सकाळ डिजिटल टीम

दुबई : टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात झाली आहे. यामुळे एकमेकांवर डिवचणे होणारच आहे. भारत सद्या सराव सामना खेळत आहे. पहिल्या सराव सामन्यात हिटमॅन रोहित शर्मा खेळला नाही. त्यामुळे त्याच्या फलंदाजीची जादू चाहत्यांना पाहायला मिळायची आहे. खेळण्यापूर्वीच रोहित वादात सापडला आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा डावखुरा फलंदाज डेव्हिड वॉर्नरने रोहितवर चक्क चोरीचा आरोप कोला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ सर्वाधिक भारतीय संघाला घाबरतो. कारण, क्रिकेट विश्वात त्यांना टक्कर देण्याची ताकद फक्त भारतीय संघात आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय मालिका सुरू होण्याआधीच एकमेकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो. आता तर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने कहरच केला आहे. त्याने चक्क रोहित शर्मावर चोरीचा आरोप करून सर्वांच्या नजरा आपल्याकडे ओढून घेतल्या आहे.

आयसीसीद्वारे आयोजित होणाऱ्या विश्वचषकात प्रत्येक संघ नवीन जर्सी परिधान करून खेळत असतो. भारतीय संघही टी-२० विश्वचषकात नवीन जर्सी घालणार आहे. या जर्सीचे १३ ऑक्टोबर रोजी अनावरण झाले होते. त्यानंतर अनेक खेळाडूंनी नवीन जर्सी परिधान करून नवा लुक आपापल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर शेअर केला.

रोहितनेही आपल्या विशेष पद्धतीने भारतीय जर्सी सोशल मीडियावर व्हायरल केली. रोहितने इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर डेव्हिड वॉर्नरने गमतीदार कमेंट करीत रोहितवर चोरीचा आरोप केला. रोहितच्या पोस्टवर ‘तू माझ्या टीक टॉक स्टाईलची कॉपी करीत आहेस’ असे वॉर्नरने कमेंच केली आहे. चोरीचा आरोप केल्याने रोहितच्या चाहत्यांच्या भोवया उंचावल्या होत्या. दुसरीकडे सराव सामन्याआधी दबाव टाकण्याचे त्याने असे कमेंच केल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma : वैभव सूर्यवंशी, इशान किशन अन् तो! रोहितचा उत्तराधिकारी म्हणून BCCI कोणाला संधी देणार? एक खेळाडू जो केव्हापासून संधीच्या शोधात होता...

Ravindra Dhangekar: माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल; खलील शेख प्रकरणात मोठी कारवाई

Nagpur News : रामभक्तांना ‘हरामखोर’ म्हणणाऱ्यांना ‘रामरक्षा’ आठवली! निमंत्रणावरून संजय राऊतांवर संदीप जोशींचा घणाघात

वाहतूक पोलिसांना आता ‘सर्व्हिस गन’ बाळगणे अनिवार्य, विश्वास नांगरे पाटील यांचे थेट आदेश

BREAKING: रोहित शर्मा Lords वर निवृत्ती जाहीर करणार? IND vs ENG तिसरा वन डे सामना शेवटचा, धक्का देणारी Inside Story

SCROLL FOR NEXT