india-pakistan india-pakistan
क्रीडा

आयसीसीच्या स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास भारत नकार का देत नाही?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : क्रिकेट विश्वात भारत आणि पाकिस्तान हे दोन देश कट्टर प्रतिस्पर्धी आहे. जसं ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये खेळली जाणारी ॲशेस कसोटी मालिका पाहण्यासाठी चाहते मैदानात हजेरी लावतात तशीच गर्दी भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या जाणाऱ्या टी-२० व एकदिवसीय सामन्यासाठी होत असते. भारताचा पहिला सामना २४ ऑक्टोबरला पाकिस्तानशी होणार आहे. भारत किंवा पाकिस्तान आयसीसीच्या स्पर्धेमध्ये एकमेकांशी खेळण्यास नकार देऊ शकत नाही. त्यामागचे कारण आपण जाणून घेणार आहोत.

मागील अनेक वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील द्विपक्षीय मालिका बंद आहे. जम्मू-काश्मीरमध्ये नागरिकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध चांगलेच बिघडले. पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादी हल्ले बंद करीत नाही तोपर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेट खेळला जाणार नाही, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

बीसीसीआयने असा निर्णय घेतल्याने प्रेक्षकांना दोन्ही देशांमध्ये होणाऱ्या सामन्यांना मुकावे लागत आहे. असे असले तरी आयसीसीद्वारे आयोजिण्यात येणाऱ्या स्पर्धेत दोन्ही देश एकमेकांसमोर थाटतात. यामुळेच बीसीसीआय आणि सरकारने आयसीसी टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध खेळण्याचा पुनर्विचार करावा अशी चर्चा होती. हा सामना भारताने खेळू नये अशी मागणी केली जात होती. तरीही भारत पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळणार आहे.

हे आहे कारण

आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय वचनबद्धतेनुसार कोणताही देश दुसऱ्या कोणत्याही देशाविरुद्ध खेळण्यास नकार देऊ शकत नाही. कारण, आयसीसी क्रिकेट विश्वातील आयोजक संस्था आहे. त्यांच्याद्वारे टी-२० वर्ल्डकप, एकदिवसीय विश्वचषक, कसोटी चॅम्पियनशिप आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. त्यांनी ठरवलेल्यानुसार संघांना सामना खेळावा लागतो. दोन्ही देशांचे संबंध चांगले नसले तरी भारताला सामना खेळावाच लागणार आहे. भारताने हा सामना खेळण्यास नकार दिला तर त्यांचे गुण पाकिस्तानच्या संघाला दिले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BREAKING: रोहित शर्मा Lords वर निवृत्ती जाहीर करणार? IND vs ENG तिसरा वन डे सामना शेवटचा, धक्का देणारी Inside Story

VIDEO : मुंबईत मोठी दुर्घटना! ११व्या मजल्यावरून क्रेन कोसळली, १२ गाड्यांचं मोठं नुकसान, एक जण जखमी...

Pune Birth-Death Records: जन्म-मृत्यू दाखल्यांतील दुरुस्तीला उच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; पुणे महापालिकेला अधिकार, प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे आदेश

RAVINDRA JADEJA: रवींद्र जडेजाचं वनडे करिअर संपणार? 2027 विश्वचषकासाठी डच्चू, अक्षर पटेलला प्राधान्य; अहवालात मोठा दावा

Akkalkot Hannur coordination meet: हन्नूरमध्ये ‘सहविचार सभा’द्वारे चपळगाव गटातील १८ गावांच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा; प्रशासन-लोकप्रतिनिधींचा अभिनव समन्वय

SCROLL FOR NEXT