Inzamam ul Haq sakal media
क्रीडा

T20 World Cup 2021 : विजेतेपदाची भारताला संधी

आपल्या यु-ट्युब चॅनेलवर त्यांनी भारतीय संघाला असलेली संधी, त्यांच्या फलंदाज, गोलंदाजांच्या कामगिरीची विश्लेषण केले आहे

सकाळ वृत्तसेवा

दुबई : ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील ‘सुपर १२’ फेरीला शनिवारपासून सुरुवात होणार असली तरी ‘फायनल बिफोर फायनल’ म्हणजे भारत आणि पाकिस्तान ही लढत रविवारी होत आहे. ही लढत जिंकणे म्हणजे स्पर्धेतील अर्धा दबाव कमी करण्यासारखे असते. त्यामुळे कोण जिंकेल यावर मतप्रदर्शन सुरू झाले आहे. पाकिस्तानचे माजी कर्णधार इंझमाम-उल-हक यांनी आपल्या संघावर विश्वास न दाखविता थेट भारताला विजेतेपदासाठी पसंती देत पाकिस्तानला ‘घरचा आहेर’ दिला आहे.

आपल्या यु-ट्युब चॅनेलवर त्यांनी भारतीय संघाला असलेली संधी, त्यांच्या फलंदाज, गोलंदाजांच्या कामगिरीची विश्लेषण केले आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष असलेले इंझमाम म्हणाले, ‘‘युएई आणि ओमान मधील वातावरणामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताला विजेतेपदाचा करंडक उंचावण्याची सर्वाधिक संधी आहे. कोणत्याही स्पर्धेत नेमका हाच संघ जिंकेल, असे सांगता येत नाही. मात्र, कुणाला किती संधी आहे, याविषयी अंदाज व्यक्त करता येतो. यानुसारच भारताला या स्पर्धेत सर्वाधिक संधी आहे.’’

इंझमाम पुढे म्हणाले, ‘‘भारताकडे सर्वाधिक अनुभवी ट्वेन्टी-२० खेळाडू आहेत. त्यामुळे त्यांना रोखणे कठीण आहे. दोन्ही सराव सामने जिंकून भारताने उत्तम सुरुवात केली आहे.’’ भारताने पहिल्या सराव सामन्यात इंग्लंडला तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. भारतीय खेळाडूंच्या या कामगिरीमुळे इंझमाम भलतेच खूष झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

मानसवेध : तमसो मा ज्योतिर्गमय

विशेष : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील निर्णय

Poha-Rava-Curd Pancake: पोहे नेहमीच बनवता? एकदा करून पाहा पोहे-रवा दही पॅनकेक; चवीला कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT