Team India Twitter
क्रीडा

T20 World Cup: टीम इंडियाची आज इंग्लंडविरूद्ध 'सराव' परीक्षा

विराज भागवत

T20 WC मध्ये भारतीय संघ दोन सराव सामने खेळणार

T20 World Cup 2021: स्पर्धेत भारताच्या परीक्षेचा मुहूर्त २४ तारखेचा असला, तरी पूर्वतयारी आजपासून सुरू होत आहे. इंग्लंडविरुद्ध आज होणारा सराव सामना भारतासाठी संघरचना तयार करण्याकरिता उपयोगी ठरणार आहे. विश्वकरंडक स्पर्धेसाठी असलेल्या सर्व भारतीय खेळाडूंकडे नुकत्याच संपलेल्या IPL चा मोठा अनुभव आहे, पण आता टीम इंडियासाठी एकत्रित कामगिरी करण्यासाठी सराव सामना महत्त्वाचा ठरणार आहे.

साधारणतः पाच फलंदाज एक अष्टपैलू आणि पाच गोलंदाज अशी रचना केली जाते. तसेच कोणी कोणत्या क्रमांकावर खेळायचे हा सुद्धा नियोजनाचा भाग असतो, परंतु IPL मुळे वेगवेगळी समीकरणे तयार झाली होती. बंगळूर संघातून विराट कोहली सलामीला खेळला होता. तो विश्वकरंडक स्पर्धेतही हीच जागा कायम ठेवण्याची शक्यता कमी आहे, पण रोहितसह सलामीला केएल राहुल की इशान किशन हा प्रश्न संघ व्यवस्थापनाला सोडवावा लागणार आहे.

हार्दिक पंड्यामुळे चिंता

हार्दिक पंड्याला अष्टपैलू खेळाडू म्हणून स्थान देण्यात आलेले आहे, परंतु तो गोलंदाजी करत नसल्यामुळे पेच निर्माण झाला आहे. परिणामी राखीव खेळाडूत असलेल्या शार्दूल ठाकूरचा मुख्य संघात समावेश करण्यात आला. पंड्याला केवळ फलंदाज म्हणून समावेश केला तर संघाचा समतोल बिघडू शकतो, त्यामुळे बुमरा, महम्मद शमी किंवा भुवनेश्वर यांच्या साथीला शार्दूल अंतिम संघात खेळू शकेल आणि हे प्रयोग सराव सामन्यातच केले जातील.

फिरकीचीही चिंता

आयपीएलच्या अनुभवावरून भारतासमोर फिरकीचीही चिंता आहे. रवींद्र जडेजाचे स्थान निश्चित आहे, पण आयपीएलमध्ये अपयशी ठरलेल्या अश्विन आणि राहुल चहर यांच्यासाठी नव्याने सुरुवात करण्याकरिता सराव सामने उपयुक्त ठरतील, यातून त्याची मानसिकता किती सक्षम आहे हेसुद्धा कळणार आहे.

आजचा सराव सामना- भारत वि. इंग्लंड - सायंकाळी ७.३० वाजता (थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्‌स)

भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, वरुण चक्रवर्ती, राहुल चहर, शार्दूल ठाकूर, जसप्रित बुमरा, महम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या.

इंग्लंडचा संघ- ऑईन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, सॅम बिलिंग्ज, लिएम लिव्हिंगस्टोन, डेव्हिडम मलान, जॉस बटलर, जॉनी बेअरस्टॉ, मोईन अली, टॉम करम. ख्रिस जॉर्डन, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, तेमल मिल्स, आदील रशीद आणि मार्क वूड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मीरारोडवर अखेर मनसेचा मोर्चा

MNS Mira bhayandar Morcha: हिंदी भाषिकांच्या मोर्चाला परवानगी मग मनसेला का नाही? देवेंद्र फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण...

Viral Video : हृदयस्पर्शी व्हिडिओ ! ममतेची मूर्ती आहे हा गोरिला, आईकडे मूल सोपवून जिंकली लाखो लोकांची मने

Supreme Court: बिहार निवडणुकीवर गहजब; मतदार याद्या सुप्रीम कोर्टाच्या दरबारात

कोविड लसीमुळे येतोय हृदयविकाराचा झटका? खरं कारण आलं समोर; AIIMS, ICMR नंतर कर्नाटक समितीच्या अहवालात काय?

SCROLL FOR NEXT