T20 WC 2022 esakal
क्रीडा

T20 WC 2022: 'आयसीसीलाच भारताला सेमीफायनल पर्यत न्यायचंय!' आफ्रिदी बरळला

पाकिस्तानचा अष्टपैलु आणि माजी कर्णधार शाहिद आफ्रीदी हा कायम भारताविरोधात जे नाही ते बरळत असतो.

सकाळ डिजिटल टीम

T20 World Cup 2022: पाकिस्तानचा अष्टपैलु आणि माजी कर्णधार शाहिद आफ्रीदी हा कायम भारताविरोधात जे नाही ते बरळत असतो. त्याच्या नव्या विधानानं नेटकऱ्यांनी त्याची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. भारताविरोधात पाकिस्तान हरला तर त्या सामन्याकडे एक खेळाडू आणि खिलाडूवृत्ती म्हणून न पाहता सर्वसामान्य प्रेक्षकाच्या भूमिकेतून त्याला पाहण्याची सवय लागली आहे असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

शाहिदनं सोशल मीडियावर पुन्हा एकदा भारताच्याविरोधात टीका टिप्पणी केली आहे. जी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे नेटकऱ्यांनी आफ्रिदेला शेलक्या शब्दांत सुनावले आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजानं शोएब अख्तरनं भारत सेमीफायनलमध्ये जाणार की नाही यावरुन मोठं वक्तव्य केलं होतं. तोच धागा पकडून आता आफ्रिदेनं केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. भारतानं बांग्लादेशचा पराभव केला आणि पाकिस्तानच्या पोटात दुखू लागले. त्यानंतर त्यानं सोशल मीडियावर आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.

आफ्रिदी म्हणतो, बांग्लादेशविरोधात विजय मिळवल्यानंतर भारत हा दुसऱ्या स्थानावर गेला आहे. या सामन्या दरम्यान पाऊस पडला. मात्र ज्या घाईनं पुन्हा सामना सुरु करण्यात आला, त्यावरुन असे दिसते आहे की, आयसीसीला भारताला काही करुन सेमीफायनलपर्यत न्यायचेच आहे. आफ्रिदेच्या त्या वक्तव्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा होऊ लागली आहे. नेटकऱ्यांनी त्याच्यावर सडकून टीका केली आहे.

अंपारिंग पाहून आफ्रीदी नाराज....

सध्या क्रिकेटविश्वात जे होते ते पाहून मला आश्चर्य वाटते. आता त्या फिल्डिंवरुन नवी चर्चा सुरु झाली आहे. शाकिब अल हसन तरी काय वेगळं करत होता. आणि ते सगळ्यांनी त्या स्क्रिनवर पाहिलं देखील. मैदान ओलं झालं होतं. त्यामुळे मला आता असं वाटतं आहे की, काहीही झालं तरी आयसीसीला भारताला सेमीफायनलपर्यत न्यायचे आहे. तसाच सगळा प्रकार आहे. भारत आणि पाकिस्तान सामन्याच्यावेळी जे पंच होते त्यांना तर जगातील सर्वोत्तम पंच असा अॅवॉर्ड मिळायला हवा. असा टोमणाही आफ्रीदेनं मारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : जर मला एखाद्याला विरोध करायचा असेल, तर तसा करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे - मिलिंद देवरा

SCROLL FOR NEXT