T20 World Cup sakal
क्रीडा

T20 World Cup : ICC चा मोठा निर्णय, पावसामुळे उपांत्य फेरीचे बदलले नियम

ICC ने घेतला उपांत्य आणि अंतिम सामन्यांसाठी हा मोठा निर्णय

Kiran Mahanavar

T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 विश्वचषक स्पर्धेचा थरार एकदम एकदम रंजक मोडला आहे. सध्याच्या टी-20 विश्वचषकाच्या बाद फेरीसाठी आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. आयसीसीने उपांत्य आणि अंतिम सामन्यांच्या अटी जाहीर केल्या आहेत. या अटी ग्रुप स्टेजच्या सामन्यांपेक्षा वेगळ्या आहेत.

उपांत्य आणि अंतिम सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. पाऊस पडल्यास ज्या स्थितीत सामना होणार तेथून दुसऱ्या दिवशीची सुरुवात होईल. म्हणजेच हा सामना नव्याने खेळवला जाणार नाही. दोन्ही संघांमध्ये 10-10 षटकांचा खेळ झाल्यास तो डकवर्थ-लुईस नियमानुसार ठरवला जाईल. आधी पावसामुळे सामना झाला नाही तर, किमान 5-5 षटकांचा खेळ झाल्यानंतरच डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारे निर्णय घेतला जात होता.

उपांत्य फेरीच्या सामन्यात पावसामुळे चेंडू टाकला गेला नाही तर, त्यांच्या गटात अव्वल स्थानी असलेल्या संघाला विजेता घोषित केले जाईल. गट टप्प्यात सर्वाधिक विजय मिळविणाऱ्या संघाला अंतिम फेरीत प्रवेश दिला जाईल. त्याचवेळी अंतिम सामन्यात पावसाचा जोर कायम राहिल्यास आणि सामना होऊ शकला नाही, तर दोन्ही संघांना संयुक्तपणे विजेता घोषित केले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT