Kane Williamson sakal
क्रीडा

Kane Williamson : 'कॅप्टन केन' सूर्या बनायला गेला अन् बोल्ड झाला - VIDEO व्हायरल

कुणालाही जमतं का ते.... तो सुर्या आहे तू विल्यम आहे! सोशल मीडियावर मीम्स

सकाळ ऑनलाईन टीम

Kane Williamson : न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या T20 विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात शाहीन शाह आफ्रिदीने शानदार गोलंदाजी केली. T20 विश्वचषक मध्ये सुरुवातीला शाहीन त्या लयीत नव्हता पण हळूहळू त्याने आपली लय पकडली आणि आता तो आपल्या जुन्या फॉर्ममध्ये दिसत आहे. या सामन्यात शाहीनने किवी संघाचा कर्णधार केन विल्यमसनची विकेट घेतली. सूर्या बनायला गेला आणि आउट झाला.

शाहीनने न्यूझीलंडविरुद्ध दोन विकेट्स घेतल्या आणि किफायतशीर गोलंदाजी केली. त्याने चार षटकांच्या कोट्यात फक्त 24 धावा दिल्या. त्याने किवी संघाच्या प्रमुख फलंदाज फिन ऍलनला आणि नंतर विल्यमसनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याने पहिल्याच षटकात ऍलनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते. 17व्या षटकात तो पुन्हा गोलंदाजीसाठी आला. त्याच्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर विल्यमसनने सूर्यकुमार यादवसारखा स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू थेट मधल्या लेग स्टंपवर जाऊन लागला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने खराब सुरूवातीनंतर डाव सावरत 20 षटकात 4 बाद 152 धावांपर्यंत मजल मारली. न्यूझीलंडकडून डॅरेल मिचेलने झुंजार अर्धशतक केले. कर्णधार केन विलियम्सनने 46 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने 2 विकेट्स घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT