T20 World Cup 2022 Sixth Upset  sakal
क्रीडा

T20 World Cup : ऑस्ट्रेलियात दुबळ्या संघांनी केली क्रांती! तब्बल सहा अपसेट

ग्रुप-2 मध्ये हे काय घडलं! चोकर्स नेदरलँडकडून हरले

Kiran Mahanavar

T20 World Cup 2022 Sixth Upset : टी-20 विश्वचषक 2022 मध्ये नेदरलँड्सने सर्वात मोठा अपसेट केला. अ‍ॅडलेडमध्ये नेदरलँड्सने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला स्पर्धेतूनच बाद केले. उपांत्य फेरी गाठण्यासाठी आफ्रिकन संघाला हा सामना जिंकावाच लागणार होता. सुपर-12 मध्ये आफ्रिकेने चार सामन्यांत त्याचे पाच गुण होते. हा सामना जिंकला असता तर तो अंतिम-4 मध्ये पोहोचला असता, पण नशिबाने त्यांना पुन्हा साथ दिली नाही. अपसेटचा सहावा संघ ठरला.

या विश्वचषकातील आतापर्यंतचा सर्वात मोठा अपसेट -

टी-20 विश्वचषक 2022 मध्ये पात्रता फेरीत आपल्याला तीन अपसेट पाहायला मिळाले. पहिल्यांदा अशिया कप चॅम्पियन श्रीलंकाला नामिबियाकडू 55 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर दोन वेळची चॅम्पियन वेस्टइंडीज दोन वेळा अपसेटची बळी ठरली. आधी स्कॉटलंडने वेस्ट इंडिजला 42 धावांनी तर पुन्हा एकदा आयर्लंडने नऊ विकेट्स पराभव केला. त्यामुळे वेस्टइंडीज संघाचे सुपर-12 आधीच आव्हान संपुष्टात आले.

त्यानंतर सुपर-12 च्या सामन्यात आयर्लंडने इंग्लंडला मोठा धक्का दिला. आयर्लंडने इंग्लंडचा 5 धावांनी (DLS) पराभव केला. ग्रुप 2 मध्ये पाकिस्तान सुद्धा अपसेटचा बळी ठरला. झिम्बाब्वेने पाकिस्तानला एक धावेने पराभव करत आव्हान जवळपास संपुष्टात आणले होते. अ‍ॅडलेडमध्ये नेदरलँड्सने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत स्पर्धेतूनच बाद केले. नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकाचा 13 धावांनी पराभव केला.

दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्यात अॅडलेड ओव्हलवर खेळल्या गेलेल्या सामन्यात नेदरलँड्सने मोठा धुव्वा उडवला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या नेदरलँड संघाने निर्धारित षटकांत चार गडी गमावून 158 धावा केल्या. त्याचवेळी लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ निर्धारित षटकांत 8 गडी गमावून 145 धावांवर थांबला. अशाप्रकारे नेदरलँड संघाने शेवटच्या सामन्यात 13 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

माकडामुळे गावात ६ दिवस लॉकडाऊनसारखी स्थिती, हल्ल्यात ७० जण जखमी; ५ ते ७ जण गंभीर

Panvel Flood Risk: पनवेलला पुराचा धोका? विमानतळासाठी भराव, बदललेल्या नदीपात्रामुळे संकट ओढावण्याची भीती

SCROLL FOR NEXT